न्यूयॉर्क, 23 एप्रिल : कोरोनामुळे अमेरिकेत सध्या हाहाकार माजला आहे. न्यूयॉर्क शहर हे सध्या कोरोनाचे नवे केंद्र झाले आहे. दिवसागणिक न्यूयॉर्कमध्ये मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. न्यूयॉर्कमधील वैद्यकिय कर्मचारीही जीव मुठीत धरून रुग्णांवर उपचार करत आहेत. असेच न्यूयॉर्क सिटीमधील दाम्पत्य सध्या शहरातील सर्वात कठीण आपत्कालीन कक्षात कार्यरत आहेत. 37 वर्षीय डॉ. अॅडम आणि डॉ. नीना बुधीराजा यांच्यावर आपल्या मुलासाठी मृत्यूपत्र तयार करण्याची वेळ आली आहे.
डॉ. अॅडम आणि डॉ. नीना यांच्या मते, जर दोघांता मृत्यू झाला तर त्यांच्या 18 महिन्यांच्या मुलाची काळजी कोण घेणार?. डॉ.नीना सांगतात की, "गेल्या एका महिन्यापासून आमचे दिवसरात्रचे रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि मृत्यू हेच पाहत आहोत. कोरोनामुळे सध्या वैद्यकीय कर्मचारी जीव मुठीत घेऊन वावरत आहेत". डॉ. निना यांच्या म्हणण्यानुसार, नवरा अॅडम आपत्कालीन डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे फेसबुक पेज रोज पाहतात. यात त्यांनी सगळेच कर्मचारी संघर्ष करीत असल्याचे आढळले. कोरोनामुळे अमेरिकेत 8 लाख 52 हजार 703 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 47 हजार 750 लोकांचा मृत्यू झाला आहे.
वाचा-कोरोनाविरुद्ध 44 रुग्णांनी एकाच वेळी दिला लढा; हम होंगे कामयाब गाण्यानं सन्मान'हे सर्व भावनिक आणि चिंताजनक'
डॉ. नीना यांनी सांगितले की, "त्यांनी कोरोनाला कंटाळून नोकरी सोडण्याचा विचार केला होता, परंतु या परिस्थितीत माघार घेऊ शकत नाही. गेल्या आठवड्यात अॅडमचा सहकारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे सतत विचारात असते की, माझ्या नंतर मुलांचे काय होईल? ते खूप भावनिक आणि चिंताजनक आहे". यामुळे नीना आणि अॅडम यांनी आपल्या मुलासाठी मृत्यूपत्र तयार केले आहे.
वाचा-'लॉकडाऊनमुळे 12 कोटी नोकऱ्यांवर गदा, केंद्र सरकाने 7500 रुपयांची मदत करा''एखाद्या युद्धाप्रमाणे परिस्थिती'
डॉ.नीनाने सांगितले की, "आम्ही आमच्यानंतर आमचा मुलगा नोलनचे काय होईल याचा विचार करत असतो. कोण त्याची काळजी घेईल? हे आपण ठरवायचे आहे. नोलनचा जन्म तीन महिन्यांपूर्वी झाला होता. त्याचे फुफ्फुस खूप नाजूक आहेत आणि त्याला संसर्ग होण्याचा धोका देखील आहे". डॉय नीना आणि अॅडम दोघंही दिवस रात्र रुग्णांची सेवा करत आहेत, मात्र कोरोनाच्या भीतीमुळे तेही हतबल झाले आहेत.
वाचा-'भारतात जन्म ही माझी चूक', ट्रम्प यांच्या इमिग्रेशनच्या घोषणेवर भारतीय नाराज
संपादन, संकलन-प्रियांका गावडे
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.