जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Facebook वरुन तुमचा डेटा लीक तर झाला नाही ना? या सोप्या Trick ने असं तपासा

Facebook वरुन तुमचा डेटा लीक तर झाला नाही ना? या सोप्या Trick ने असं तपासा

 तुमचा डेटा लीक झाला असेल किंवा लीक झाला नसेल, तरी खाली मेसेजमध्ये याबाबतची माहिती दिसेल.

तुमचा डेटा लीक झाला असेल किंवा लीक झाला नसेल, तरी खाली मेसेजमध्ये याबाबतची माहिती दिसेल.

तुमचा डेटा लीक झाला की नाही हे तपासता येऊ शकतं. काही सोप्या पद्धतींनी तुमच्या डेटाबाबतची माहिती घेता येऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 जुलै: मागील काही दिवसांत डेटा लीकबाबतची (Data Leak) अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे आपला डेटा सुरक्षित आहे ना? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होऊ शकतो. या प्रश्नाचं सोप्या पद्धतीने उत्तरही मिळवता येऊ शकतं. तुमचा डेटा लीक झाला की नाही हे तपासता येऊ शकतं. काही सोप्या पद्धतींनी तुमच्या डेटाबाबतची माहिती घेता येऊ शकते. ‘Have i been pwned’ नावाच्या वेबसाईटद्वारे तुमचा डेटा लीक झाला की नाही हे समजू शकेल. यासाठी या वेबसाईटवर ईमेल आणि फोन नंबर टाकावा लागेल. डिटेल्स टाकल्यानंतर वेबसाईट तुमची माहिती या डेटाबेसमध्ये आहे की नाही हे वेरिफाय करेल. या वेबसाईटची प्रायव्हसी पॉलिसी नीट वाचा. त्याशिवाय युजर्स त्यांचा ईमेल आणि फोन नंबर सार्वजनिकरित्या सर्चमध्ये सामिल न होण्यासाठी opt in करू शकतात. मागील काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या (Facebook) 533 मिलियन म्हणजेच जवळपास 53.30 कोटी युजर्सचा खासगी डेटा हॅकर्स फोरमवर लीक करण्यात आला होता. हा डेटा 106 देशातील युजर्सचा असल्याची माहिती मिळाली होती. …तर Online तिकीट बुक करता येणार नाही, जाणून घ्या बुकिंगसाठी IRCTC चा नवा नियम त्याआधीही भारतात डेटा लीकबाबतची माहिती समोर आली होती. ज्यात 9.9 कोटी भारतीयांचा डेटा लीक झाला होता. मोबिक्विकच्या 9.9 कोटी युजर्सचा डेटा उडवल्याचा दावा हॅकर्सकडून करण्यात आला होता. लीक डेटामध्ये फोन नंबर, बँक खातं क्रमांक, ईमेल, क्रेडिट कार्ड नंबर अशा अनेक गोष्टी सामिल होत्या. स्मार्टफोनमध्ये होणारं Ad Tracking असं करा ब्लॉक; ट्रॅकिंग रोखण्यासाठी पाहा सोप्या स्टेप्स डेटा लीक न होण्यासाठी स्ट्राँग पासवर्ड किंवा पासवर्ड मॅनेजरचा वापर करावा. तसंच अकाउंटची सिक्योरिटी वाढवण्यासाठी, सिक्योरिटी एक्स्ट्रा लेअर देण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन अॅक्टिव्ह करणं फायद्याचं ठरतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात