जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / तुमचं पॅनकार्ड चोरीला गेलं तर काय करायचं? पुन्हा Pan card मिळेल का?

तुमचं पॅनकार्ड चोरीला गेलं तर काय करायचं? पुन्हा Pan card मिळेल का?

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर e-PAN Card डाउनलोड करू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे पॅन कार्डची PDF फाइल पासवर्डने सुरक्षित असेल. हा पासवर्ड तुमची जन्मतारीख असेल.

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर e-PAN Card डाउनलोड करू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे पॅन कार्डची PDF फाइल पासवर्डने सुरक्षित असेल. हा पासवर्ड तुमची जन्मतारीख असेल.

आपले डॉक्युमेंट गहाळ होतात अशावेळी सर्वात मोठं टेन्शन म्हणजे आता ते परत कसं मिळणार? आपल्या बँक अकाऊंटचं काय होणार?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: पॅनकार्डचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. याचं कारण म्हणजे मोदी सरकारने आता पॅनकार्ड थेट बँकेशी जोडलं आहे. तुमच्या एका पॅननंबरवर सगळी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे तुमचा पॅननंबर खूप महत्त्वाचा आहे. जर एखाद्यावेळी असं झालं की आपली पर्स किंवा पाकीट चोरीला जातं. आपले डॉक्युमेंट गहाळ होतात अशावेळी सर्वात मोठं टेन्शन म्हणजे आता ते परत कसं मिळणार? आपल्या बँक अकाऊंटचं काय होणार? तुमच्या मनातही हे सगळे प्रश्न असतील तर त्याची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुमचं पॅनकार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेलं तर तेही परत मिळू शकतं. आपल्या डिव्हाइसवर कागदपत्रे स्टोअर करण्यासाठी ई-पॅन कार्ड पीडीएफ डाउनलोड करण्याची सुविधा आयटी विभागाने सुरू केली आहे. ई-पॅन कार्डमुळे कोणालाही गरज पडल्यास कधीही आणि कुठेही पॅन कार्ड वापरता येऊ शकतं. तुम्ही तुमच्या फोनमध्ये हे पॅनकार्ड डाऊनलोड करून ठेवायला हवं. तुमच्यासोबत असा काही प्रसंग ओढवला तर तुमच्याकडे ही सगळी माहिती असेल. त्यामुळे तुमची गैरसोय होणार नाही.

तुमच्या PAN कार्डवर कोणी लोन तर घेतलं नाही? कसं चेक करायचं

onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN या बेवसाईटला भेट द्या. तिथे तुम्हाला दोन पर्याय मिळतील. Acknowledgement Number आणि दुसरा पॅनकार्ड डाऊनलोड करायचा, हा दुसरा पर्याय निवडा. तुम्हाला त्यानंतर 10 अंकी अल्फान्यूमेरिक पॅन कार्ड नंबर टाका. तुम्हाला तिथे विचारलेली सगळी माहिती तिथे अपलोड करा. सगळे डिटेल्स भरल्यानंतर तुम्ही बॉक्सवर टिक करा आणि सबमिट करा. तुम्हाला तुमचा पॅनकार्ड नंबर मिळेल आणि तुम्ही PDFमध्ये डाऊनलोड करू शकता. Acknowledgement Numberच्या मदतीने ई-पॅन डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं तेही आम्ही सांगणार आहोत. अगदी सोपं आहे. तुम्हाला पुन्हा वर दिलेल्या साईटवर जायचं आहे. तिथे आता तुम्हाला पहिला पर्याय निवडायचा आहे.

मृत्यूनंतर PAN, आधार अन् मतदार ओळखपत्राचं काय करायचं? ते कसं वापरलं जाऊ शकतं?

त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे असलेला Acknowledgement Number अपलोड करा. जन्मतारीख, त्यानंतर कॅप्चा कोड असे तपशील भरा. सबमिट पर्यायावर क्लिक करा. पीडीएफ स्क्रीनवर तुमचे ई-पॅन कार्ड दिसेल. तुम्हाला तुमचा पॅनकार्ड नंबर मिळेल आणि तुम्ही PDFमध्ये डाऊनलोड करू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

Pan Card : तुम्हीही चुकून बनवली 2 पॅनकार्ड, लगेच करा हे काम, अन्यथा होईल जेल! तुम्ही पॅनकार्ड मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला आधी पॅनकार्ड हरवल्याची तक्रार दाखल करावी लागेल. NOC घेऊन तुम्ही पॅनकार्डसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला पॅनकार्ड मिळेल. मात्र गैरसोय टाळण्यासाठी तुम्ही ई पॅनकार्डचा वापर करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात