मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता थेट WhatsAppवर डाउनलोड करा Aadhaar अन् PAN card; पाहा प्रोसेस

आता थेट WhatsAppवर डाउनलोड करा Aadhaar अन् PAN card; पाहा प्रोसेस

आता थेट WhatsAppवर डाउनलोड करा Aadhaar अन् PAN card; पाहा प्रोसेस

आता थेट WhatsAppवर डाउनलोड करा Aadhaar अन् PAN card; पाहा प्रोसेस

WhatsApp वर, तुम्ही MyGov Helpdesk WhatsApp chatbotद्वारे डिजिलॉकरवरून तुमची आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी कागदपत्रे सहजपणे डाउनलोड करू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 1 ऑक्टोबर: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं (Meity) काही वर्षांपूर्वी DigiLocker सेवा सुरू केली होती. डिजीलॉकर डिजिटल स्वरूपात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि मार्कशीट यासारख्या प्रमाणीकृत कागदपत्रे/प्रमाणपत्रांमध्ये उपलब्ध होतात. आधार धारकांसाठी एक डेडिकेटेड डिजीलॉकर वेबसाइट आणि अ‍ॅप आहे, त्याच्या सेवा WhatsApp वर देखील उपलब्ध आहेत. MyGov Helpdesk WhatsApp chatbot द्वारे लोकांना डिजीलॉकरवरून आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी कागदपत्रे सहजपणे डाउनलोड करता येऊ शकतात.

माय गव्हर्नमेंट हेल्पडेस्क चॅटबॉट वापरून, तुम्ही काही सोप्या स्पेप्समध्ये तुमचं कोणतंही अधिकृत दस्तऐवज सहजपणे डाउनलोड करू शकता आणि त्यात प्रवेश करू शकता. कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, मार्कशीट आणि बरंच काही समाविष्ट आहे. त्यामुळे जर तुम्हाला अजूनही वेबसाइट किंवा अॅपद्वारे डिजीलॉकर चालवण्यात अडचण येत असेल, तर WhatsApp चॅटबॉट सेवा तुमच्यासाठी आहे. आधार कार्डपासून ते पॅन आणि अगदी मार्कशीटपर्यंत, व्हॉट्सअ‍ॅपवर तुमच्यासाठी सर्व काही उपलब्ध असेल.

WhatsApp वरील MyGov HelpDesk चॅटबॉट वरून तुमचे दस्तऐवज एक्सेस करण्यासाठी, येथे आम्ही स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजावून सांगणार आहोत:

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आधार, पॅन कसे डाउनलोड करावे:

स्टेप 1: तुमच्या फोनमध्ये MyGov हेल्पडेस्क संपर्क क्रमांक +91-9013151515 सेव्ह करा.

स्टेप 2: आता WhatsApp उघडा आणि तुमची WhatsApp संपर्क सूची रिफ्रेश करा.

स्टेप 3: MyGov Helpdesk Chatbot शोधा आणि उघडा.

स्टेप 4: आता MyGov हेल्पडेस्क चॅटमध्ये 'नमस्ते' किंवा 'हाय' टाइप करा.

स्टेप 5: चॅटबॉट तुम्हाला डिजिलॉकर किंवा कोविन सेवा यापैकी एक निवडण्यास सांगेल. येथे 'DigiLocker Services' निवडा.

हेही वाचा: 5G Launching Updates: देशात आजपासून 5G सेवा सुरू, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार शुभारंभ

स्टेप 6: आता चॅटबॉट विचारेल की तुमचे डिजिलॉकर खाते आहे का, म्हणून येथे 'होय' वर टॅप करा. तुमच्याकडे नसेल तर अधिकृत वेबसाइट किंवा डिजिलॉकर अॅपला भेट देऊन तुमचे खाते तयार करा.

स्टेप 7: चॅटबॉट आता तुमचा 12-अंकी आधार क्रमांक तुमच्या DigiLocker खाते लिंक आणि ऑथेंटिकेट करण्यासाठी विचारेल. तुमचा आधार क्रमांक टाका आणि सेंड वर क्लिक करा.

स्टेप 8: तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल. चॅटबॉटमध्ये नोंदणी करा.

स्टेप 9: चॅटबॉट लिस्ट तुम्हाला तुमच्या DigiLocker खात्याशी संबंधित सर्व कागदपत्रांची सूची दाखवेल.

स्टेप 10: तुमचा दस्तऐवज डाउनलोड करण्यासाठी सूचीबद्ध केलेला नंबर टाइप करा आणि सेंड वर क्लिक करा.

स्टेप 11: तुमचं कागदपत्र PDF फॉर्ममध्ये चॅट बॉक्समध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल.

लक्षात ठेवा, तुम्ही एका वेळी फक्त एकच दस्तऐवज डाउनलोड करू शकता. तसेच तुम्ही फक्त डिजिलॉकरद्वारे जारी केलेले दस्तऐवज डाउनलोड करू शकता. जर तुमची आवश्यक कागदपत्रे इश्यू केली गेली नाहीत, तर तुम्ही ती डिजीलॉकर साइट किंवा अॅपवर मिळवू शकता.

First published:

Tags: Aadhar card, Pan card, Whatsapp