मुंबई : आपले डॉक्ट्यूमेंट हे जपून ठेवं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोरोना काळापासून सायबर फ्रॉड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता सगळीकडे पॅनकार्ड आणि आधारकार्ड लागतात. मात्र त्याचा कोणी गैरवापर तर करत नाही ना? हे देखील पाहाणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचं खातं लवकर रिकामं होऊ शकतं. आयकर विभागाच्या सर्व कामात तुमचं पॅनकार्ड महत्त्वाची भूमिका बजावतं. त्याचे महत्त्व पाहता फसवणूक करणारी टोळी त्याच्यावर नजर ठेवून असते. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमच्या या पॅनकार्डचा गैरवापर करून तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. तुमच्या पॅनकार्डचा आधार घेऊन तुमच्या नावाने लोन काढलं जाऊ शकतं. बँकेतून लोन घेणं जरी कठीण असलं तरी आता बरेच लोन App आहेत. ज्यावर तुमचा नंबर टाकून लोनसाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. बँकेत बरेच डॉक्युमेंट पडताळले जातात. त्यानंतर लोन दिलं जातं. त्यामुळे तिथे भीती नाही. मात्र त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. अशावेळी तुमच्या पॅन कार्डवर काही कर्ज घेतलं गेलं आहे का, हे तपासणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही सिबिल, इक्विफॅक्स, पेटीएम, बँक बझार किंवा क्रिफसोबत तुमचा सिबिल स्कोअर चेक करू शकता आणि रेकॉर्ड पाहू शकता.
मृत्यूनंतर PAN, आधार अन् मतदार ओळखपत्राचं काय करायचं? ते कसं वापरलं जाऊ शकतं?cibil च्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथे तुमच्या पॅनकार्डचा कोणी गैरवापर तर केला नाही ना हे पाहू शकता. या साईटवर गेल्यावर Get Your CIBIL Score पर्याय निवडा. तिथे तीन सब्सक्रिप्शन प्लॅन निवडायचे आहेत. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुमची माहिती, बँकेशी लिंक असलेला नंबर आणि ईमेल आयडी द्यावा लागेल. त्यानंतर पासवर्ड जनरेटचा पर्याय ओपन होईल. व्हेरिफिकेशन पूर्ण करा आणि पेमेंट प्रोसेस पूर्ण करा. ओटीपीने अकाऊंट लॉगइन करा. एक फॉर्म दिला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर तपासू शकता.
इथे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर किती कर्ज घेतली गेली आहेत, हेही कळतं. तुमच्या पॅनचा गैरवापर झाला आहे किंवा तुमच्या पॅनवर दुसऱ्या कोणी कर्ज घेतलं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही incometax.intelenetglobal.com/pan/pan.asp जाऊन त्याबद्दल तक्रार करू शकता.