मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आषाढी एकादशीचा उपवास केलाय का? शरद पवारांच्या उत्तरानंतर एकच हश्या पिकला!

आषाढी एकादशीचा उपवास केलाय का? शरद पवारांच्या उत्तरानंतर एकच हश्या पिकला!

यावेळी पवारांनी खुलेपणाने सर्व प्रश्नांची उत्तर दिली.

यावेळी पवारांनी खुलेपणाने सर्व प्रश्नांची उत्तर दिली.

यावेळी पवारांनी खुलेपणाने सर्व प्रश्नांची उत्तर दिली.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 10 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी आज औरंगाबाद येथून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी शरद पवारांना विविध विषयांवर प्रश्न विचारले. अगदी एकनाथ शिंदेंच्या बंडापासून ते त्यांनी राष्ट्रपदी पदाची उमेदवारी नाकारण्यापर्यंत विविध विषयावर पवारांनी खुलेपणाने मत व्यक्त केलं.

गेल्या महिन्यात शरद पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी दगडूशेठच्या गणपती मंदिरात न जाता बाहेरुनच हात जोडले होते. यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती.  'मी आज  नॉनव्हेज खाल्ले असल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही', असं यावेळी शरद पवार म्हणाले, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

आज आषाढी एकादशी असल्याने अनेकजण उपवार करतात. त्यामुळे पत्रकारांनी थेट शरद पवारांना आज तुमचा उपवास आहे का असा सवाल उपस्थित केला. यावेळी पवारांनीही अगदी आवर्जुन हो म्हणून सांगितलं. याशिवाय सकाळी निघताना भगरचा फराळ करून आल्याचंही सांगितलं.

आस्तिक आणि नास्तिकच्या मुद्द्यावरुन अनेकदा शरद पवारांना घेरलं जातं. राष्ट्रवादीच्या भूमिकेवरही अनेकदा भाजपकडून सवाल उपस्थित केले जातात.

एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल काय म्हणाले शरद पवार?

बंडाच्या कारणामागे सांगितल्या जाणाऱ्या निर्णयाला आधार नाही. या निर्णयाला काहीच आधार दिसत नाही. त्यामुळे भविष्यात बंडखोरांना जनतेसमोर येऊन खरं कारण सांगावं लागेल. मध्यावधी निवडणुका लागतील असं मी म्हणालो नाही. पुढील निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा असं सांगितलं आहे. आपल्या हातात दोन वर्ष आहे. हे लक्षात ठेऊन कामाला लागलं पाहिजे. 2024 साली निवडणूक एकत्र लढवावी अशी मनस्थिती आहे. मविआ म्हणून एकत्र लढावं अशी माझी इच्छा आहे. पण, अद्याप एकत्र लढवण्यावर चर्चा नाही. जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा ठरवू, असं पवार म्हणाले. शिंदे यांचं बंड एका दिवसात झालं नाही. बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी जी तत्परता दाखवली. अशी तत्परता दाखवणारे पहिले राज्यपाल. पहिल्यांदाच 48 तासांत बहुमत चाचणीचा निर्णय देण्यात आला. औरंगाबादच्या निर्णयाबाबत सुसंवाद नव्हता. मंजुर झाल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली, अशीही कबुली पवार यांनी दिली. संजय राऊत यांच्यावर टीका करणारे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, असा टोला पवार यांनी बंडखोर नेते दीपक केसरकर यांना लगावली.

First published:

Tags: Ashadhi Ekadashi, NCP, Sharad Pawar (Politician), Wari