मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Geeta Kapoor ने सर्वांसमोर आणली खासगी बाब; पाहताच Malaika arora ही लाजेने गुलाबी झाली

Geeta Kapoor ने सर्वांसमोर आणली खासगी बाब; पाहताच Malaika arora ही लाजेने गुलाबी झाली

'द कपिल शर्मा शो'च्या (The Kapil Sharma Show) सेटवरील गीता कपूर (Geeta Kapoor) आणि मलायका अरोराचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

'द कपिल शर्मा शो'च्या (The Kapil Sharma Show) सेटवरील गीता कपूर (Geeta Kapoor) आणि मलायका अरोराचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

'द कपिल शर्मा शो'च्या (The Kapil Sharma Show) सेटवरील गीता कपूर (Geeta Kapoor) आणि मलायका अरोराचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 30 सप्टेंबर ; इंडियाज बेस्ट डान्सर' या रिअॅलिटी टीव्ही शोचा पुढील सीझन लवकरच सुरू होणार आहे आणि या सीझनची टॅगलाईन 'बेस्ट का नेक्स्ट' अशी आहे. या शोचा पहिला सीजन 2020 मध्ये आला जो खूप यशस्वी झाला आणि आता या शोचा दुसरा सीझन येणार आहे. या शोच्या प्रमोशनासाठी या शोचे परीक्षक मलायका अरोरा (Malaika arora) गीता कपूर (Geeta Kapoor) आणि टेरेन्स लुईस (Terence Lewis) 'द कपिल शर्मा शो'च्या (The Kapil Sharma Show) सेटवर पोहचले. यावेळी सेटवर मलायकाच्या वॉकची चर्चा रंगली असल्याचे दिसली. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

'द कपिल शर्मा शो'च्या स्टेजवर  या तिघांचीही  एन्ट्री झाल्यानंतर टेरेन्स लुईस आणि गीता कपूरने असं काही केलं की, ज्यामुळे मलायकाचे लाजून पाणी पाणी झालं असं म्हटलं तरी वावग वाटायला नको.

" isDesktop="true" id="611298" >

मलायका नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. यासोबतच तिला अनेकवेळी तिच्या चालण्यावरून, वॉकवरू देखील नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

हे वाचा - 'तिच्या विश्वासाने आज सर्व काही दिलं'; खास व्यक्तीसाठी भरत जाधवची भावनिक पोस्ट

यासंबंधीचा प्रश्न कपिलने गीता कपूरला विचारला. यावर गीताने मलायकाच्या चालण्याची कॉपी करून दाखवली. मलायका सकाळी वॉकला कशी जाते, तसंच ती चालताना कशी चालते. गीताने मलायकाची केलेली मिमिक्री पाहून सर्वंजण जोराने हसू लागले. मलायका अरोरा देखील स्वतःचे हसू आवरू शकली नाही. गीताच्या या कृतीमुळे तिचा चेहरा लाजेने गुलाबी झाला. या शोचा प्रोमो व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि तो प्रचंड व्हायरल होत आहे

हे वाचा -  लग्नाला दहा महिने झाल्यानंतर सई नवऱ्याबरोबर निघाली हनिमूनला; शेअर केले Photo

मलायका अरोरा दररोज सकाळी तिच्या कुत्र्याला फिरायला घेऊन जाते आणि बऱ्याच वेळा तिचा स्टायलिश वॉक पापाराझी कॅमेऱ्यात कैद करत असतात. अलिकडेच मलायका अरोरा तिच्या चालण्यामुळे चर्चेत आली होती आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर तिची खिल्ली देखील उडवली होती.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Malaika arora