मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'तिच्या विश्वासाने आज सर्व काही दिलं'; खास व्यक्तीसाठी Bharat Jadhav ची भावनिक पोस्ट

'तिच्या विश्वासाने आज सर्व काही दिलं'; खास व्यक्तीसाठी Bharat Jadhav ची भावनिक पोस्ट

भरत जाधवच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासात या खास व्यक्तीचं मोलाचं योगदान आहे.

भरत जाधवच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासात या खास व्यक्तीचं मोलाचं योगदान आहे.

भरत जाधवच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासात या खास व्यक्तीचं मोलाचं योगदान आहे.

मुंबई, 30 सप्टेंबर : नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात अभिनेता भरत जाधवने (Bharat Jadhav) आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर छाप उमटवली आहे. भरत जाधवचा इथपर्यंचचा प्रवास नक्की सोपा नव्हता. पण या कठीण परिस्थितीतही त्याला एका खास व्यक्तीने साथ दिली. म्हणतात ना...प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्री असते अगदी तसंच भरत जाधवच्या आयुष्यात देखील त्याच्या पत्नीचे खूपमोठे योगदान आहे  (Bharat Jadhav Wife).

अभिनेता भरत जाधवच्या पत्नीचे नाव सरिता जाधव (Sarita Jadhav) आहे. सरिता आज वाढदिवस. भरतने आपल्या बायकोसह आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यात तिच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

"मी नोकरी वगैरे करेन की नाही मला माहित नाही.माझं करिअर अधांतरी आहे...तुम्ही तुमची कलेची आवड जोपासा मी तुमच्या सोबत आहे..!!"काहीच नसताना दिलेल्या ह्या विश्वासाने आज सर्व काही दिलं....असं म्हणत त्यांनी पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्याविषयी प्रेम व्यक्त केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

अशी ही आशिकी या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी भरत जाधव आणि सरिता यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा त्यांनी सांगितला होता.

हे वाचा - लग्नाला दहा महिने झाल्यानंतर सई नवऱ्याबरोबर निघाली हनिमूनला; शेअर केले Photo

सरीताने सांगितलं होतं, भरतचा तिच्या ऑफिसमध्ये फोन आला होता. ते दोघं पहिल्यांदा भेटणार होते. लवकर निघण्यासाठी ती वरिष्ठांची परवानगी मागायला गेली होती तर येशील ना उद्या... असं विचारत तिची टर उडवली होती. त्या दोघांनी पहिल्यांदा खिलाडी हा चित्रपट एकत्र पाहिला होता. हा चित्रपट पाहण्यात नव्हे तर फक्त तिच्यासोबत गप्पा मारण्यात आणि वेळ घालवण्यात भरतला रस होता, अशी त्याने कबुली दिली होती.

हे वाचा - 'आई कुठे काय करते' मालिका बंद करा' ; 'या' कारणासाठी मालिका होतेय TROLL

भरत जाधव यांनी आजवर अनेक मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केले असून आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याने अनेक हिंदी चित्रपटात देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

First published:

Tags: Actor, Entertainment, Marathi entertainment