जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नाला दहा महिने झाल्यानंतर सई नवऱ्याबरोबर निघाली हनिमूनला; शेअर केले Photo

लग्नाला दहा महिने झाल्यानंतर सई नवऱ्याबरोबर निघाली हनिमूनला; शेअर केले Photo

लग्नाला दहा महिने झाल्यानंतर सई नवऱ्याबरोबर निघाली हनिमूनला; शेअर केले Photo

कोरोना काळात लग्न झालं. आता लग्नाला दहा महिने झाल्यानंतर हे कपल पहिल्या वहिल्या हनिमूनसाठी मालदीवला गेले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 सप्टेंबर : बिग बॉस (Bigg Boss Marathi) फेम मराठीमोळी अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सई सोशल मीडियावर तिचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील पोस्ट करत असते. सई लोकूरने 30 नोव्हेंबर 2020 रोजी तीर्थदीप रॉयसोबत  (tirthadeep roy )लगीनगाठ बांधली होती. त्यानंतर आता लग्नाला दहा महिने झाल्यानंतर हे कपल पहिल्या वहिल्या हनिमूनसाठी ( Sai Lokur And Tirthadeep Roy Celebrating Honeymoon) मालदीवला गेले आहेत. सईने तिच्या इन्स्टावर तिच्या या हनिमूनचे फोटो पोस्ट केले आहेत.  सईचा हनिमून स्पेशल लाल रंगाच्या बिकिनीची सोशल मीडियालवर चांगलीच चर्चा रंगली आहे. सई आणि तिर्थदीप मालदीवमध्ये निसर्गरम्य वातावरणाची मजा लुटत आहेत. या हनिमून ट्रीपचे फोटो सईने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. लाल रंगाच्या बिकीनीतील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  तिचे हे फोटो चाहत्यांना देखील आवडले आहेत . सो हॉट..अशा काही कमेंट नेटकऱ्यांनी सईच्या या फोटोंना केल्या आहेत. वाचा : गौतमी देशपांडेनं घेतला ब्रिटनच्या राणीसारखा LOOK; तुम्ही पाहिलात का हे फोटो? बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीजनमध्ये सई लोकूर स्पर्धक म्हणून दिसली होती. त्यानंतर सईचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. मागील वर्षी सईच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. यासोबतच सईचा स्वत:चा दागिन्यांचा व्यवसाय देखील आहे तसेच तिचा यूट्यूब चॅनेल देखील आहे. सई नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. तिचा हा हनिमून लूक देखील चाहत्यांना  आवडलेला आहे. यापूर्वी मराठमोळी अभिनेत्री  सोनाली कुलकर्णी देखील हनिमूनसाठी मालदीवला गेली होती.  पती कुणालसोबतचे काही  सुंदर फोटो सोनालीने सोशल मीडियावर शेअर केले होते.

जाहिरात

एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरुन झाली सई आणि तिर्थदीप यांची ओळख सई आणि तिर्थदीप यांची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरुन झाली होती. याविषय़ी तिने ‘ई टाइम्स’ला मुलाखतदेखील दिली होती. “गेल्या दोन वर्षांपासून मी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर माझ्या ‘मिस्टर परफेक्ट’ला शोधत होती. तिर्थदीप आणि माझी ओळखसुद्धा मॅट्रिमोनिअल साइटवरूनच झाली आणि ऑगस्टपासून आम्ही बोलू लागलो. काही दिवसांतच आम्हाला एकमेकांचा स्वभाव आवडू लागला आणि एकमेकांविषयी आम्ही फार सकारात्मक होतो. त्यानंतर तो आईला घेऊन बेळगावला मला भेटायला आला. त्या भेटीतच आमचं लग्न ठरलं. खूप घाईत प्रत्येक गोष्ट घडली पण माझ्यासाठी हेच नातं असावं असं मला मनापासून वाटतंय,” असं सईने या मुलाखतीत सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात