Home /News /news /

मुंबई इंडियन्स होणार नवं सत्ताकेंद्र, 2 दिग्गज सांभाळणार टीम इंडियाची जबाबदारी!

मुंबई इंडियन्स होणार नवं सत्ताकेंद्र, 2 दिग्गज सांभाळणार टीम इंडियाची जबाबदारी!

विराट कोहलीनं (Virat Kohli) टी 20 टीमची कॅप्टनसी सोडल्यानंतर (Virat Kohli to quit as T20 Captain in T20 World Cup 2021) त्याच्या जागी नवा कॅप्टन कोण होणार ? याची चर्चा सुरू झाली आहे.

    मुंबई, 17 सप्टेंबर : विराट कोहलीनं (Virat Kohli) टी 20 टीमची कॅप्टनसी सोडल्यानंतर (Virat Kohli to quit as T20 Captain in T20 World Cup 2021) त्याच्या जागी नवा कॅप्टन कोण होणार ? याची चर्चा सुरू झाली आहे. विराटचा उत्तराधिकारी म्हणून रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव सर्वात आघाडीवर आहे.  रोहित हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी अशा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमचा कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसी खाली मुंबई इंडियन्सनं (MI) पाचवेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. टीम इंडियाचा सध्याचा व्हाईस कॅप्टन असलेला रोहित हा टी20 क्रिकेटमधील यशस्वी कॅप्टन मानला जातो. याबाबतच्या रिपोर्टनुसार रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या व्हाईस कॅप्टन पदासाठी फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे नाव आघाडीवर आहे. बुमराहची या पदासाठी केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) या दोघांशी स्पर्धा आहे. मात्र या दोघांच्याही खेळात सातत्याचा अभाव राहिला आहे. राहुलला इंग्लंड विरुद्धच्या टी20 सीरिजमधून वगळण्यात देखील आलं होतं. विराट कोहलीनं कॅप्टनसी का सोडली? सौरव गांगुलीनं सांगितलं कारण विराट कोहलीनं इंग्लंड विरुद्ध सीरिजनंतर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये ओपनिंग करण्याचे संकेत दिले होते. तसं झालं तर राहुलची टीममधील जागा धोक्यात येऊ शकते. मिडल ऑर्डरमध्ये टीम इंडियाकडं सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा हे बॅट्समन आहेत. तसंच पंतची टी20 मधील कामगिरी देखील तितकी खास झालेली नाही. कर्णधारपद सोडण्यापूर्वी विराट आणि रोहितचं काय झालं बोलणं? का सोडली कॅप्टन्सी? दुसरिकडं जसप्रीत बुमराहची तिन्ही फॉर्मेटमधील टीम इंडियामध्ये जागा पक्की आहे. बुमराहचा शांत स्वभवाव हा त्याच्या यशाचं गमक मानला जातो. त्यानं खेळामुळे टीममधील खेळाडूंमध्ये चांगला आदर देखील कमावला आहे. 6 महिन्यांपासून सुरु होता विराट आणि BCCI यांच्यातील संघर्ष, वाचा Inside Story टीममधील बॅलन्स राखण्यास मदत एक बॅट्समन आणि एका बॉलरला प्रमुख जबाबदारी मिळाली तर टीममधील बॅलन्स कायम राखले जाऊ शकते. त्यामुळे टीममधील दोन्ही वर्गाला प्रतिनिधित्व मिळेल. तसंच तरुण खेळाडूंना भविष्यात कॅप्टन म्हणून तयार करण्यासाठी देखील याचा उपयोग होईल. बुमराह सध्या 27 वर्षाच आहे. तर रोहित शर्माचं नय 34 आहे. बुमराह आयपीएलमध्येही रोहित शर्मासोबतच खेळतो. सतत एकत्र खेळल्यानं दोघांमधील केमिस्ट्री देखील चांगली आहे. त्याचाही टीमला फायदा होऊ शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Jasprit bumrah, Mumbai Indians, Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या