जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Shocking! रोहित शर्माला टीम इंडियाच्या Vice Captain पदावरुन हटवण्याचा होता विराटचा प्लान

Shocking! रोहित शर्माला टीम इंडियाच्या Vice Captain पदावरुन हटवण्याचा होता विराटचा प्लान

Shocking! रोहित शर्माला टीम इंडियाच्या Vice Captain पदावरुन हटवण्याचा होता विराटचा प्लान

क्रिकेट विश्वातून रात्री उशिरा सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : विराट कोहलीच्या (Virat Kohli) टी20 कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेसह टीम इंडियाच्या (Indian cricket team) ड्रेसिंग रूममधून अनेक मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. एक रिपोर्टनुसार आता विराट कोहलीला भारतीय टीमच्या सर्व खेळाडूंचं समर्थन मिळू शकलेलं नाही. विराट कोहलीच्या अनेक निर्णयांवर सवाल उपस्थित केले जात आहे. सर्वात मोठी बातमी तर अशी आहे की, विराट कोहलीने निवड समितीला प्रस्ताव दिला होता की, त्यांनी रोहित शर्माला (Rohit Sharma) उपकर्णधारपदावरून हटवावं. विराट कोहलीच्या विरोधात ज्युनिअर खेळाडूंना मध्येच सोडून दिल्याची चर्चादेखील सुरू आहे. (Virat Kohli went to selection committee to remove Rohit Sharma from odi vice captaincy) पीटीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, विराट कोहली निवड समितीकडे हा प्रस्ताव घेऊन गेले होते. रोहित शर्मा वनडे टीमच्या उपकर्णधार पदावरून हटविण्यात यावं, असा प्रस्ताव विराटने दिला होता. रोहित 34 वर्षांचा आहे, हे यामागे कारण दिलं गेलं होतं. वनडे टीमचं उपकर्णधारपद केएल राहुलला सोपविण्यात यावं, अशी विराटची इच्छा होती. मात्र टी20 फॉर्मेटमध्ये ही जबाबदारी पंतांकडे असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डालादेखील विराट कोहलीचं हे वागणं आवडलं नव्हतं. ( virat kohli rohit sharma crashes) हे ही वाचा- कर्णधारपद सोडण्यापूर्वी विराट आणि रोहितचं काय झालं बोलणं? का सोडली कॅप्टन्सी? विराट कोहली ज्युनिअर खेळाडूंना अधांतरीचं सोडतात… ज्युनियर खेळांडूंबद्दल सांगायचं झालं तर या प्रकरणात कोहलीविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. विराट कोहली अडचणीच्या वेळी  ज्युनिअर खेळाडूंना मध्येच सोडून देत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एका अन्य क्रिकेटरने सांगितलं की, ‘ऑस्ट्रेलियामध्ये पाच विकेटनंतर कुलदीप यादव बाहेर गेला. ऋषभ पंत जेव्हा फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा त्याच्यासोबतही असंच झालं होतं. उमेश यादव यालादेखील असाच अनुभव आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात