मुंबई, 6 नोव्हेंबर: टीम इंडियानं स्कॉटलंडचा (India vs Scotland) 8 विकेट्सनं पराभव करत टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) सलग दुसरा विजय मिळवला आहे. शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये स्कॉटलंडची टीम फक्त 85 रनच करू शकली. भारतीय टीमनं 86 रनचं लक्ष्य 6.3 ओव्हर्समध्ये म्हणजेच फक्त 39 बॉलमध्ये पूर्ण केलं. केएल राहुलनं (KL Rahul) आक्रमक बॅटींग करत 19 बॉलमध्ये 50 रन केले. या विजयानंतर टीम इंडियानं सेमी फायनलच्या शर्यतीमध्ये पुनरागमन केलं आहे.
सुपर 12 मधील ग्रुप 2 मध्ये पाकिस्ताननं सर्व 4 मॅच जिंकल्या असून ती टीम सेमी फायनलला गेली आहे. नामिबाया 3 तर स्कॉटलंडनं 4 मॅच गमावल्या असून या टीम स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत. आता भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तीन टीमपैकी एकच टीम पुढच्या राऊंडला जाणार आहे. टीम इंडियाचा रनरेट ग्रुपमध्ये सर्वात चांगला आहे. टीमचा रनरेट 1.61 असून अफगाणिस्तानचा 1.48 आहे.
न्यूझीलंडचे 4 मॅचनंतर 6 पॉईंट्स असून त्यांचा रनरेट 1.27 आहे. भारत आणि अफगाणिस्तानचे 4 मॅचनंतर प्रत्येकी 4 पॉईंट्स आहेत. तरीही टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हान कायम आहे. आता या तिन्ही टीमची प्रत्येकी एक मॅच शिल्लक आहे. न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्यात रविवारी मॅच होणार आहे. या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला हरवलं तर त्यांची टीम स्पर्धेतून आऊट होईल, कारण त्यांचा रनरेट भारत आणि अफगाणिस्तानपेक्षा कमी आहे.
टीम इंडियाच्या विजयानंतर विराटनं कापला बर्थ-डे केक, सेलिब्रेशनचा VIDEO VIRAL
टीम इंडियाला संधी
अफगाणिस्तानचा रनरेट देखील टीम इंडियापेक्षा कमी आहे. त्यांनी रविवारच्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला तर त्यांचेही 6 पॉईंट्स होतील. तसंच त्यांचा रनरेट टीम इंडियापेक्षा चांगला होऊ शकतो. पण, तरीही टीम इंडियासाठी काळजी कारण नसेल. कारण, भारताची शेवटची मॅच सोमवारी नामिबिया (India vs Namibia) विरुद्ध होणार आहे. या मॅचमध्ये रनरेट चांगला करण्यासाठी काय करावं लागेल याची टीम इंडियाला कल्पना असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, New zealand, T20 world cup, Team india