मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: टीम इंडियाच्या विजयानंतर विराटनं कापला बर्थ-डे केक, सेलिब्रेशनचा VIDEO VIRAL

T20 World Cup: टीम इंडियाच्या विजयानंतर विराटनं कापला बर्थ-डे केक, सेलिब्रेशनचा VIDEO VIRAL

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) शुक्रवारी वाढदिवस होता. भारतीय कॅप्टनला टीमनं स्कॉटलंडवर (India vs Scotland) दमदार विजय मिळवत गिफ्ट दिलं.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) शुक्रवारी वाढदिवस होता. भारतीय कॅप्टनला टीमनं स्कॉटलंडवर (India vs Scotland) दमदार विजय मिळवत गिफ्ट दिलं.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) शुक्रवारी वाढदिवस होता. भारतीय कॅप्टनला टीमनं स्कॉटलंडवर (India vs Scotland) दमदार विजय मिळवत गिफ्ट दिलं.

दुबई, 6 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं स्कॉटलंडचा (India vs Scotland) 8 विकेट्सनं दणदणीत पराभव केला. भारतीय बॉलर्सनी सुरुवातीला भेदक मारा करत स्कॉटलंडला 85 रनमध्ये ऑल आऊट केलं. त्यानंतर 86 रनचं टार्गेट फक्त 39 बॉलमध्ये पूर्ण करत सर्वात मोठा विजय मिळवला. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) शुक्रवारी वाढदिवस होता. भारतीय कॅप्टनला टीमनं या दमदार विजयाचं गिफ्ट दिलं.

भारतीय टीम या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये परताच विराटच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी भारतीय टीममधील सर्व खेळाडू तसंच कोचिंग स्टाफ उपस्थित होता. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विराटनं वाढदिवसाचा केक कापला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ (Virat Kohli Birthday Celebration Video) बीसीसीआयनं शेअर केला आहे.

या मॅचमध्ये विराट कोहलीनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर  भारताने स्कॉटलंडला 85 रनवर ऑल आऊट केले. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहला 2 विकेट घेण्यात यश आलं.

IND vs SCO: वादळी खेळीनंतर राहुलनं दिली आथिया शेट्टीवरील प्रेमाची कबुली

स्कॉटलंडने दिलेलं 86 रनचं आव्हान टीम इंडियाने 6.3 ओव्हरमध्येच पार केलं. एवढ्या मोठ्या विजयामुळे टीम इंडियाच्या नेट रनरेट चांगलाच सुधारला आहे.  ग्रुपमधला सर्वोत्तम रनरेट करण्यासाठी स्कॉटलंडने दिलेलं 86 रनचं आव्हान टीम इंडियाला 7.1 ओव्हरमध्ये पार करणं गरजेचं होतं, पण भारताने हे आव्हान 4 बॉल आधीच म्हणजे 6.3 ओव्हरमध्ये पार केलं. यामुळे भारताचा नेट रनरेट आता +1.619 एवढा झाला आहे. 4 मॅचमध्ये 2 विजय आणि 2 पराभवांसह भारताच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: T20 world cup, Video Viral On Social Media, Virat kohli