मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक नोंद, 8 मृत्यू

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक नोंद, 8 मृत्यू

हैदराबादला कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढतो आहे. व्हायरसचा प्रसार वेगात असतानाही लोक सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. त्याचा फटका एका हिरेव्यापाऱ्याला बसला. या घटनेने हैदराबाद हादरुन गेलं आहे.

हैदराबादला कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढतो आहे. व्हायरसचा प्रसार वेगात असतानाही लोक सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. त्याचा फटका एका हिरेव्यापाऱ्याला बसला. या घटनेने हैदराबाद हादरुन गेलं आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महानगरपालिका आयुक्तांनी लॉकडाऊनबाबत नवा आदेश काढला आहे.

कल्याण, 12 जुलै: महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट आता आणखी गडद होऊ लागलं आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसोबतच आता अन्य शहरे आणि ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक 661 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे तर आज 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा... GOOD NEWS: कोरोना लशीची मानवी चाचणी यशस्वी; लस सुरक्षित असल्याचा संशोधकांचा दावा

कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासांत तब्बल 661 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कल्याण (पू) : 129, कल्याण (प) : 172,

डोंबिवली (पू) : 190, डोंबिवली (प) :118, मांडा-टिटवाळा : 14, मोहना : 37, पिसवली : 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कल्याण-डोंबिवली क्षेत्रात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजारांवर पोहोचला आहे. सध्या 6269 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 6355 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर क्षेत्रात आतापर्यंत 189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातल्या रुग्णांची संख्या गेली 1 लाखांच्यावर

राज्यात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यात रविवारी Active रुग्णांच्या संख्येने 1 लाखांचा टप्पा पार केला. राज्यात आज नवे 7827 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्याची एकूण संख्या 254427 एवढी झाली आहे. तर Active रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 516 एवढी झाली आहे. आज 3340 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण मृत्यूची संख्या 10289 एवढी झाली आहे. मुंबईत 1243 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या 92988 एवढी झालीय. तर 44 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5288 एवढी झाली आहे.

कल्याण-डोंबिवलीत नवा आदेश..

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महानगरपालिका आयुक्तांनी लॉकडाऊनबाबत नवा आदेश काढला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2 जुलैला या भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. हा लॉकडाऊन 12 जुलैपर्यंत असेल, असं सांगण्यात आलं होतं.

हेही वाचा...मुख्यमंत्री- ऊर्जामंत्र्यांचा पुतळा जाळला, विदर्भ आंदोलन समिती पुन्हा आक्रमक

मात्र, कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये वाढ झाल्यानंतर या काळात आधीचेच नियम लागू असतील, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Dombivali, Kalyan, KDMC