मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांचा पुतळा जाळला, विदर्भ राज्य आंदोलन समिती पुन्हा आक्रमक

वाढीव विज बिलावरून विदर्भ राज्य आंदोलन समिती पुन्हा आक्रमक झाली आहे.

वाढीव विज बिलावरून विदर्भ राज्य आंदोलन समिती पुन्हा आक्रमक झाली आहे.

  • Share this:
नागपूर, 12 जुलै: वाढीव विज बिलावरून विदर्भ राज्य आंदोलन समिती पुन्हा आक्रमक झाली आहे. कोरोनाच्या काळातील सर्व विदर्भातील जनतेला विज बिलातून मुक्त करा, या मागणीसाठी समितीचे कार्यकर्ते रविवारी नागपुरात रस्त्यावर उतरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निषेध करून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, ऊर्जामंत्री हाय हाय, मुर्दाबाद मुर्दाबाद ऊर्जामंत्री मुर्दाबाद अशा घोषणाबाजी केली. एवढंच नाही तर ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळे यावेळी जाळण्यात आले. हेही वाचा...नात्याला काळिमा! आई-बहिणीसोबत अश्लिल चाळे करायचा मुलगा, जन्मदात्रीनेच दिली सुपारी! विदर्भ राज्य आंदोलन समितीने रविवारी नागपूर शहरातील मध्यभागात राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात तिव्र आंदोलन करण्यात आलं. कोरोना काळात नागरिकांना अव्वाच्या सव्वा विज विले आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व सामान्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पोट कसं भरायचं ही परिस्थीती जनतेसमोर आहे. अशा परिस्थितीत विजेचं बिल कसे भरणार, अशा प्रश्न उभा राहिला आहे. हेही वाचा...कोरोनाबाबत जनजागृती करणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या घरात कसा घुसला कोरोना? कोरोना काळात सर्व जनता घरी थांबली असता महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा विजेचं बिल पाठण्यात आलं आहे. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्यातल्या जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप  विदर्भ राज्य आंदोलन समितीनं केला आहे.  सर्व विदर्भातील जनतेला विज बिलातून मुक्त करा, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Published by:Sandip Parolekar
First published: