नवी दिल्ली,10 मार्च:काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला पक्षाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य हे तर च चर्चेत आहेतच सोबत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे सुद्धा ट्रेंडिंगमध्ये आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर आता सचिन पायलटही काँग्रेसला रामराम ठोकणार का? अशी खमंग चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्याने मध्य प्रदेशात मोठा राजकीय भूकंप आला आहे. ज्योतिरादित्य यांच्या समर्थक 20 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडलं असून मध्य प्रदेशात आपलं सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी खटपट सुरु केली आहे.
Jyotiraditya Scindia has gone rogue but Sachin Pilot is trending on top. Ashok Gehlot be like : pic.twitter.com/8nnEQ0071I
दुसरीकडे, सचिन पायलट यांनी मध्य प्रदेशचा राजकीय पेच लवकरच सुटेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 'मला आशा आहे की मध्यप्रदेशवर घोंघावणारं राजकीय संकट लवकरच संपुष्टात येईल. सर्व नेते मतभेदांना दूर सारण्यात यशस्वी होतील. निवडणुकीत दिलेल्या वचनांना पूर्ण करण्यासाठी राज्याला एका स्थिर सरकारची गरज आहे' असं सचिन पायलट यांनी ट्वीट केलं आहे.
Rajasthan Deputy Chief Minister Sachin Pilot: I am hopeful that the current crisis in MP ends soon and that leaders are able to resolve differences. The state needs a stable government in order to fulfill the promises made to the electorate. #MadhyaPradesh (File pic) pic.twitter.com/ZzNCMeAmXy
मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं कमलनाथ सरकार संकटात सापडलं आहे. पक्षाचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर पक्षाच्या 20 आमदारांनीही राजीनामा दिलाय. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. या आधीही ज्योतिरादित्य शिंदे यांना मानणाऱ्या काही मंत्री आणि आमदारांनी राजीनामा दिला होता. ते मंत्री आणि आमदार बंगळुरमध्ये असल्याचं बोललं जातं आहे. भाजपचे पक्ष प्रभारी खासदार विनय सहस्त्रबुद्धे हे तातडीने भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. तर दिल्लीतून तातडीने भोपाळमध्ये दाखल झालेले मुख्यमंत्री कमलनाथ हे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत आहेत. मात्र परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेल्याचा अंदाज राजकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात कमळ फुलणार असल्याचं संकेत मिळत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांनी राजीनामा पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. देशभर रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे. मध्यप्रदेशातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. तिथे तिनही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. ज्योतिरादित्य हे सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. तर ते स्वतंत्र पक्ष काढतील असंही बोललं जातंय. या आधी मध्यप्रदेश सरकारमधल्या शिंदे समर्थकांनी राजीनामे दिले आहेत.
दरम्यान, कर्नाटक नंतर आता मध्यप्रदेशमध्ये सत्तेचं नाट्य रंगलं आहे. आता या नाट्याला आज गंभीर वळण मिळालं आहे. कमलनाथ सरकारच्या तब्बल 22 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. एकाचवेळी 22 मंत्र्यांनी राजीनामे दिलेल्यामुळे काँग्रेस अडचणीत सापडले आहे. तर आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणून त्यांना मंत्रिपदाचं आमीष दाखवलं जात असल्याचं बोललं जातं आहे.