मुंबई 10 मार्च : मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं सरकार संकटात सापडलं आहे. पक्षाला मोठं खिंडार पडलं असून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 20 समर्थक आमदारांनी राजीनामे दिलेत तर 6 मंत्र्यांची मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हकालपट्टी केली आहे. शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमधल्या असंतोषाचा फायदा भाजपने घेतला असून त्याचे पडसाद इतर राज्यांमध्येही उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. मध्यप्रदेशातल्या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रात जाणवणार का? काका जरा जपून...असं ट्वीट केलंय. त्यामुळे राज्यातल्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झाल्यापासूनच राज्यात कुरबुरी सुरू आहेत. महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत 80 तासांचं सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर अजित पवारांचं बंड शरद पवारांच्या प्रयत्नांमुळे शांत झालं. शरद पवारांनीच अशक्य वाटणारं हे सरकार आणलं असं श्रेय दिलं गेलं. आता मध्यप्रदेशातल्या घटनेमुळे राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधले मतभेद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
हे वाचा - अजबच 'शिमगा'... घोड्यावरून नाही, गाढवावरून काढली जाते जावयाची मिरवणूक
दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्याचा राज्य सरकारवर काहीही परिणाम होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली. तर माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी हा पक्षाला मोठा धक्का असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा हा पक्षासाठी नि:संशय मोठा धक्का आहे. त्यामुळं पक्षाचं नुकसान होणार आहे. ते टाळता आलं असतं का मला माहीत नाही.
मध्यप्रदेशातील भूकंपाचे हादरे महाराष्ट्रात जाणावतायत का??? काका जरा जपून...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 10, 2020
‘कोरोना’चा असाही धसका, साखरपुड्यासाठी गेलेला तरुण लग्नच उरकून आला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sharad pawar