पाऊस पुन्हा परतणार का? काय म्हणालं हवामान खातं?

पाऊस पुन्हा परतणार का? काय म्हणालं हवामान खातं?

उद्यापासून मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण आणि गोव्यातही जोरदार पाऊस पडणार आहे.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : उद्यापासून मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण आणि गोव्यातही जोरदार पाऊस पडणार आहे.  मध्य महाराष्ट्रात ४ दिवसांनंतर पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे.

नैर्ऋत्य मोसमी पावसाने सध्या कोकणवगळता राज्यातील इतर भागामध्ये चिंताजनक उघडीप दिली आहे. बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाचा पट्टा गायब झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. ५ जुलैनंतर समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता असून, त्यानंतर पावसाचा जोर वाढू शकेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस कोकण, घाटमाथा वगळता उर्वरित राज्यात पाऊस आरामच करणार असल्याचा अंदाजही वर्तविला आहे.

हेही वाचा

तुरुंगात असलेल्या 'या' बाबाचे भक्त होते बुरांडीचं कुटुंब

महाराष्ट्रात अफवेचं भूत, मालेगावात चौघांना स्थानिकांकडून बेदम मारहाण

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास, आता कारवाई करणार का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2018 03:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading