शरद पवारांच्या राम मंदिराबद्दल वक्तव्याबद्दल उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...

शरद पवारांच्या राम मंदिराबद्दल वक्तव्याबद्दल उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...

'अयोध्येत जे राममंदिर उभं राहतंय त्यापेक्षा कोरोनाची चिंता जास्त आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही असं शरद पवार बोलले आहेत. त्यांचंही मत आपल्यासारखंच आहे की...'

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजपने जोरदार आक्षेप घेत राज्यभर आंदोलनं केली. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

देशात कोरोनाची परिस्थिती असून काही लोकांना असं वाटतंय की, राम मंदिर बांधून देशातून कोरोना दूर होईल, अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या हाती आयते कोलित लागले. परंतु, शिवसेनेसह, काँग्रेसने पवारांची भूमिका योग्य असल्याचं ठणकावून सांगितलं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पवारांच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

दैनिक 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत अयोध्येत जे राममंदिर उभं राहतंय त्यापेक्षा कोरोनाची चिंता जास्त आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही असं शरद पवार बोलले आहेत. त्यांचंही मत आपल्यासारखंच आहे की, कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर्स हवेत? असा सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला होता.

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'बरोबर आहे. डॉक्टर्स हवेतच. आपण ज्या सुविधा निर्माण करतो आहोत या सुविधा रुग्ण बरा करणार नाहीयत. या सुविधांच्या बरोबर डॉक्टर्स पाहिजेत. मी आधीच जे म्हटलं होतं की, जंबो फॅसिलिटी हवी. म्हणजे आम्ही काय बेडचं दुकान नाही काढलेलं. फर्निचरचं दुकान नाही काढलं. प्रदर्शन नाही भरवलं. या बेडवर जेव्हा रुग्ण येईल तेव्हा त्या रुग्णाच्या बेडच्या बाजूला डॉक्टर आणि सिस्टर पाहिजे आणि हातात औषधं पाहिजेत.' अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत - कर्नाटकची परिस्थिती गंभीर झालीय कोरोनाची. तिकडच्या मंत्र्यांनी सांगितलंय की, आता आम्ही सगळं देवावर सोडून मोकळे होतो. हे कितपत योग्य आहे?

उद्धव ठाकरे – हा सुद्धा माझ्या फेसबुक लाइव्हमधला मुद्दा होता. सगळी प्रार्थनास्थळं बंद आहेत. मंदिरं बंद आहेत. मग देव आहे कुठे? देव कुठे गेला? तर तो देव आपल्यात आहे. आपण एकमेकाला सावरणं हेच महत्त्वाचं. डॉक्टरांच्या रूपात तो आपल्याला मदत करतोय. पूर्वी शाळेत असताना आपण पिक्चर बघायचो, त्या पौराणिक सिनेमात देवादिकांच्या हातातून अशी किरणं निघतात आणि मग चमत्कार होतो. कोणीतरी मृत्युमुखी पडलेला पुन्हा जिवंत होतो. आजारी पडलेला बरा होतो. आताच्या संदर्भात याचा विचार केला तर देवाचा आशीर्वाद म्हणजे औषधाच्या रूपात तो मिळणं. रुग्णसेवा मिळणं. या सगळय़ा गोष्टी त्याचाच भाग आहेत.

महाराष्ट्रात कायमचा लॉकडाउन कधी उठणार? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

संजय राऊत -  या चार महिन्यांच्या काळात आपण मंदिरेही लॉकडाऊन केली आहेत. देवही बंदिवान आहेत…

उद्धव ठाकरे – मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देव आपल्यात आहेत.

संजय राऊत - मंदिरांची टाळी कधी उघडणार?

उद्धव ठाकरे – देव म्हणताहेत मी तुमच्यात आहे आणि त्यामुळे तुम्ही मंदिरात येऊ नका. आधी हे कोरोनाचं संकट सांभाळा. गाडगेबाबांची एक कथा मला माझ्या आजोबांनी सांगितली होती ती आठवते. ती चरित्रात पण लिहिलेली आहे. गाडगेबाबा पंढरपूरला जायचे. यात्रा असायची. म्हणजे वारी. या वेळेला ती वारीही होऊ शकली नाही.

..ही पोटदुखीची नवी लक्षणं असेल, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

असो. पण त्या काळी गाडगेबाबा पंढरपूरला जायचे ते मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायच्या आधी किंवा दर्शनाऐवजी चंद्रभागेचा काठ सकाळी खराटं घेऊन साफ करायला लागायचे. आणि त्यांना कुणी विचारलं की काय बाबा, दर्शन घेतलं का? त्यावर ते म्हणायचे, हे बघा, हे गोरगरीब माताभगिनी, मायबाप सगळे आले आहेत, हाच माझा विठोबा आहे. यांच्यातच मला विठोबा दिसतो. इकडे सगळी अस्वच्छता माजली तर रोगराई येईल. मग त्याचे काय होणार? त्यामुळे ते स्वतः खराटा घेऊन तो सगळा परिसर स्वच्छ करायचे. आता आम्ही त्यांच्या नावाने अभियान करतो, पण स्वतः काय करतो? स्वच्छ केलेल्या कोपऱ्यात झाडू मारून फोटो काढतो.

संजय राऊत - गाडगे महाराजांची परंपरा महाराष्ट्राला जशी लाभलीय तशी ठाकरे कुटुंबालाही लाभलीय…

उद्धव ठाकरे – हो, आहे ना. प्रबोधनकार ठाकरे हे मोठे उदाहरण आहे. काही गोष्टी माझ्या आजोबांकडून आठवणींच्या स्वरूपात ऐकलेल्या आहेत.

Published by: sachin Salve
First published: July 25, 2020, 10:18 AM IST

ताज्या बातम्या