Home /News /mumbai /

...ही पोटदुखीची नवी लक्षणं असेल, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

...ही पोटदुखीची नवी लक्षणं असेल, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

यामुळे कोणाला विचित्र आढळलं जसं वास जाणे, चव जाणे तर त्यांनी वैद्यकीय मदत आणि उपचार घ्यायला हवेत. मुळात राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून अनेकांचं आयुष्य बेचव झालेलं आहेट

    मुंबई, 25 जुलै : 'महाराष्ट्र कोरोनाच्या परिस्थिती त्यांनी त्यांचा जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे सगळ्या गोष्टी ते दिल्लीत जाऊन करत आहेत' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तसंच, 'राज्याने आपला मुख्यमंत्री निवडला हीच त्यांची पोटदुखी असेल', असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राज्यातले राजकारण चांगलेच तापले. फडणवीसांच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की,'  फडणवीस हे अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले होते. फडणवीस हे दिल्लीतील  तिथली कोरोनाची परिस्थिती बघत असतील. पण तिथल्या परिस्थितीबद्दल काही बोलले नाहीत ते. दिल्लीत जाऊन विरोधी पक्षनेते महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीबद्दल बोलले आहेत याचे कारण काय? तर त्यांनी त्यांचा जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे सगळ्या गोष्टी ते दिल्लीत जाऊन करत आहेत.' असा सणसणीत टोला फडणवीसांना लगावला. संजय राऊत - हे तुमचं म्हणणं जरी खरं मानलं तरी राज्यातल्या परिस्थितीचे अपडेटस् त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटून देणे कितपत योग्य आहे? खरं म्हणजे ही चर्चा मुख्यमंत्र्यांशी करायला पाहिजे. उद्धव ठाकरे – असं कोण काय म्हणतंय, काय करतंय इकडे लक्ष देत नाही. मी पुनः पुन्हा सांगतोय, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही. यांचं ठीक आहे. हे बोलतील. बोलत राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल. कारण कोरोनाची लक्षणं वेगवेगळी आहेत. लक्षणे वेगवेगळी आहेत. नक्कीच! सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आहेत असं ऐकलंय पण  सर्दी, खोकला, ताप, चव जाणे, वास जाणे, अंगावर रॅश येणं, काहीजणांची बोटं काळी-निळी पडतात.' अशी खिल्लीही फडणवीसांची उडवली. महाराष्ट्रात कायमचा लॉकडाउन कधी उठणार? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट 'पण आता मी थोडंसं गांभीर्याने सांगतोय. ही मस्करी नाहीय. आपल्यात एखादा अनपेक्षित बदल झालाय असे काही लक्षात आलंय तर तेही कोरोनाचं लक्षण असू शकतं असा एक अभ्यास आहे. त्यामुळे कोणाला विचित्र आढळलं जसं वास जाणे, चव जाणे तर त्यांनी वैद्यकीय मदत आणि उपचार घ्यायला हवेत. मुळात  राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून अनेकांचं आयुष्य बेचव झालेलं आहे.' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. संजय राऊत - विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावर खरं तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असे संकेत आहेत. पण हे संकेत विरोधी पक्षनेते फडणवीस पाळत नाहीत असे वाटते का? उद्धव ठाकरे – मी एक-दीड महिन्यापूर्वी सर्व पक्षांच्या नेत्यांची एक बैठक घेतली होती. येत्या काही दिवसांत अशी बैठक मी परत घेणार आहे. परंतु त्या वेळेला मी त्यांना मोकळेपणाने सांगितलं होतं की, आपणही मोकळेपणानं आपली जी काही निरीक्षणं असतील, काही सुधारणा असतील तर सांगाव्यात. राजकारण तर आपल्या पाचवीलाच पुजलेले आहे. सदासर्वदा राजकारण एके राजकारण. पण कोरोनाची साथ हा जनतेच्या जिवाशी खेळ होतोय. आपण म्हणता ते मी मान्य करेन की, एखाद्या कोविड सेंटरमध्ये दुरवस्था असेल, असू शकेल. पण असेल तर ती मी सुधरवली पाहिजे. कारण शेवटी ती सुविधा मी जनतेसाठी केलेली आहे. त्याच्यात जर काही उणीव असेल तर ती दूर केली गेलीच पाहिजे. आतासुद्धा आपल्याकडे काही काही औषधं, अगदी अलीकडे शोध लागलेलीही औषधं वापरली जाताहेत. मी मुद्दामहून सांगतो, डब्ल्यूएचओ असेल किंवा दूरचित्रवाणी वा वृत्तपत्रांतून कळलं की, एक औषध मिळालंय. डेकसोना नावाच्या स्टेरॉईडचं नाव आलं. त्याबद्दल टास्क फोर्सला विचारलं तर ते म्हणाले, हे औषध आपण गेले दोन महिने वापरतो आहोत. म्हणजे आपल्याकडे आधीपासूनच या औषधाचा वापर सुरू झाला आहे. हे औषध कोणाला किती द्यायचं हे प्रमाण डॉक्टरांनी ठरवायचंय. म्हणून प्रत्येक रुग्णाला हे औषध मिळालंच पाहिजे हा आग्रह आपण धरता कामा नये. ते डॉक्टरांवर सोपवलं पाहिजे.'
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस

    पुढील बातम्या