जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / काम करणाऱ्यांची चर्चा होते तर.. विरोधकांच्या महामोर्चाचा मुख्यमंत्र्यांकडून एका वाक्यात समाचार

काम करणाऱ्यांची चर्चा होते तर.. विरोधकांच्या महामोर्चाचा मुख्यमंत्र्यांकडून एका वाक्यात समाचार

काम करणाऱ्यांची चर्चा होते तर.. विरोधकांच्या महामोर्चाचा मुख्यमंत्र्यांकडून एका वाक्यात समाचार

महाविकास आघाडीकडून राज्य सरकारविरोधात उद्या 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • -MIN READ Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

रत्नागिरी, 16 डिसेंबर : एक भगवे वादळ समोर दिसते आहे. याठिकाणी मोठा जनसागर उपस्थित आहे. जिकडे पाहावे तिकडे माणसेच माणसे दिसत आहे. ही उदय सामंत यांच्या कामाची पोहोच पावती आहे. अपप्रवृत्तीला थारा देणारा कोकणी माणूस नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही बाळासाहेबांची भूमिका पुढे नेणारा विचार केला. आम्ही निवडणुकीत युती म्हणून मोदी आणि बाळासाहेबांचा फोटो लावून प्रचार केला. लोकांनी युतीला बहुमत दिलं. जे तुम्ही करायला पाहिजे होते ते केले नाही ते आम्ही दुरुस्त केले, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार आम्ही स्थापन केले त्यात आमचे काय चुकले, असा सवाल करत आरोपांना आम्ही कामातून उत्तर देऊ, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच ज्यांना खोके माहीत ते खोक्यांची भाषा करतात. 50 खोके नाही तर 750 खोके आम्ही रत्नागिरीच्या विकासाला दिले. आम्ही घेणारे नाही देणारे आहोत. खोके घरी ठेवणारे नाही. बाळासाहेब, अनंत दिघे यांची शिकवण जाणणारे आम्ही आहोत. सरकार स्थापन केल्यानंतर दोघांनी शपथ घेतली. त्यानंतर धाडसी निर्णय आम्ही घेतले. नोकर भरती आम्ही सुरू केली. जाहीर कार्यक्रमात नोकऱ्या दिल्या. 70 हजार कोटींचे उद्योग विभागात निर्णय घेतले. 35 हजार कोटींचा एमओयू हिंदुजाशी साइन केला आहे. काम करणाऱ्यांचीच चर्चा होते तर बिनकामाचे मोर्चा काढतात, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. हेही वाचा -  ठरलं! असा असेल महामोर्चाचा रोड मॅप; पोलिसांच्या 14 अटी; घराबाहेर पडण्याआधी हे वाचा आम्ही जबाबदारी म्हणून महापुरात काम केले. संकटे आल्यावर बाळासाहेबांचे शिवसैनिक रस्त्यावर उतरून स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतो. आम्ही 20-20 तास काम करत आहोत, असे ते म्हणाले. तर रत्नागिरीच्या विकासाला निधी कमी पडणार नाही. हे काम करणारे सरकार आहे. आम्ही काम करतो म्हणून लोक येत आहेत. आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर लोक आले असते का? असा सवालही त्यांनी केला. जनतेचा विश्वास सार्थ करण्याचे काम करू. या प्रेमाची जाणीव ठेवून आम्ही काम करू. आम्ही तीन महिन्यात धाडसी निर्णय घेतले याची चिंता विरोधकांना लागली आहे. हे कसे काय जमले याचे त्यांना कोडे पडले आहे, या शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात