जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठरलं! असा असेल महामोर्चाचा रोड मॅप; पोलिसांच्या 14 अटी; घराबाहेर पडण्याआधी हे वाचा

ठरलं! असा असेल महामोर्चाचा रोड मॅप; पोलिसांच्या 14 अटी; घराबाहेर पडण्याआधी हे वाचा

ठरलं! असा असेल महामोर्चाचा रोड मॅप; पोलिसांच्या 14 अटी; घराबाहेर पडण्याआधी हे वाचा

या महामोर्चामध्ये शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 डिसेंबर : महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानं आणि प्रकल्प गुजरातला पळवण्याच्या मुद्दावर महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली आहे. उद्या शनिवारी हा मोर्चा निघणार आहे. काही अटी शर्थींसह या मोर्चाला परवानगी देण्यास पोलिसांनी होकार दिला आहे. तसेच या महामोर्चाचा रोडमॅपही ठरला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या या महामोर्चाला मराठा क्रांती ठोक मोर्चानेही पाठिंबा दिला आहे. मोर्चाचे आयोजन नेमकं का - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्य भाजप नेत्यांचे छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले व अन्य महापुरुषांविषयी बेताल वक्तव्ये. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधाने, सीमाप्रश्नी इतर राज्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांच्या कटकारस्थानास राज्य सरकारची फूस असणे, सत्ताधारी नेत्यांची महिला व अन्य नेत्यांविरुद्ध बेताल वक्तव्ये तसेच महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला नेऊन राज्यातील तरुणांची फसवणूक केल्यामुळे महाविकास आघाडीकडून राज्य सरकारविरोधात उद्या 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी घातल्या या महत्त्वाच्या अटी - 1) मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रे, लाठी, पुतळे वगैरे घेऊन जाण्यास मनाई आहे. 2) मोर्चामध्ये प्राण्यांचा करण्यात येऊ नये. 3) रिचर्डसन्स क्रुडास मिल ते टाइम्स ऑफ इंडिया आयोजित मोर्चा शांततेने काढावा. 4) मोर्चामध्ये कुणीही प्रक्षोभक अथवा कुणाच्याही भावना दुखावतील, असे वक्तव्य करणार नाही. कुणाच्याही भावना दुखावतील असे लिखाण असलेले बोर्ड सोबत घेणार नाही किंवा घोषणा देणार नाही. 5) मोर्चामध्ये फटाके वगैरे वाजवण्यास प्रतिबंध राहिल. 6) मोर्चामुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. 7) कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेस बाधा येणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. 8) कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या कायदेशीर आदेशाचे पालन मोर्चामधील लोकांनी करावे. 9) मोर्चामध्ये वापरण्यात येणारी वाहने ही सुस्थितीमध्ये असावीत. वाहन चालकाकडे उचित परवाना आहे, वाहन चालकाने मादक पदार्थांचे सेवन केलेले नाही, वाहन चालक पूर्ण वेळ वाहनासोबत राहिल या बाबींची खातरजमा व पूर्तता करण्याची जबाबदारी सर्वस्वी आयोजकांची राहील. 10) मोर्चा दिलेल्या मार्गावरूनच नेण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीत मार्ग बदलू नये. 11) मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळत ठेवू नये. 12) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (3) अन्वये तत्कालीन कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती पाहून पदयात्रेचा परवाना रद्द करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, याची नोंद घ्यावी. 13) मोर्चादरम्यान महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) अन्वये प्रतिबंध घालण्यात आलेल्या बाबींचे पालन करावे. 14) मोर्चादरम्यान अश्लील हावभाव, अंगविक्षेप करू नये अथवा पादचाऱ्यांना वाहन चालकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये. हेही वाचा -  भारत जोडो यात्रेला 100 दिवसपूर्ण, राहुल गांधींनी काय कमावलं, काय गमावलं? या महामोर्चाचा मार्ग कसा असेल - सकाळी 11 वाजता या मोर्चाला भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून सुरुवात होईल. त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या समोर एका ट्रकवरच सभा आयोजित करण्यात येणार आहे. या महामोर्चामध्ये शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार,सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शरद पवार सुद्धा येण्याची शक्यता आहे. यासोबतच डावे पक्ष सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात