विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी मुंबई, 29 ऑक्टोबर : विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त काय गाजलं असेल तर ते साताऱ्यातलं शरद पवारांचं पावसातलं भाषण. शरद पवारांच्या या पावसात भिजण्यावर आता मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केली आहे. निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पावसात भिजावं लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. ते मुबंईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी युतीच्या वादावरही मोठं वक्तव्य केलं आहे. मी 5 वर्षे मुख्यमंत्री पदावर राहीन यामध्ये मला कोणतीही शंका नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे ‘अडीच-अडीच वर्षाचा शब्द कधीच दिला नव्हता’ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कुठेतरी भाजप आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेची चर्चा रंगली आहे. युतीचं सरकार येणार असलं तरी त्यातही सत्तेत कोणाला किती वाटा मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 50-50 फॉर्म्युल्यानुसार सरकार स्थापन होईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर म्हटलं होतं. तर लोकसभेत ठरल्याप्रमाणे युतीचा मार्ग निघाला नाही तर आम्ही वेगळ्या पर्यायांचा विचार करू असा इशारा आज संजय राऊत यांनी दिला. एकीकडे 50-50 चा फॉर्म्युला ठरला असल्याचं शिवसेनेनं म्हटलं तर असं काहीही बोलणं झालं नाही अशी मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. सेना-भाजपच्या या गुंत्यामुळे खरंतर सत्ता कोण स्थापन करणार? आणि कोणाचा मुख्यमंत्री असणार यावर आता नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. तर दोन्ही पक्ष आता एकमेकांच्या विरोधात ठाकणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे - सामनामध्ये येणाऱ्या गोष्टी यांचा चर्चेसाठीचा रोल नसतो. तर चर्चा भरकटवण्यासाठी असतो - पावसात भिजावं लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला - भाजपचे कपडे घालून ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या बायकोने स्वतः सांगितले की घरगुती कारणावरून ही घटना घडली आहे - अमित शाह उद्या येणार नाही. सेना भाजपमध्ये अधिकृत आणि अनधिकृत अशी चर्चा सुरू आहे - शपदविधीचा मुहूर्त अजून काढायचा आहे इतर बातम्या- युतीच्या फॉर्म्युल्यावरून शिवसेनेची आक्रमक भूमिका, निवडणार दुसरा पर्याय? - कोणती खाती कोणाला द्यायची ते ठरलं नाहीये, चर्चेला बसल्यावर ठरेल - 1995 चा फार्म्यूला आहे किंवा काय असेल असे काही ठरलेलं नाहीये ‘तुफान’ गाजलेल्या त्या पाऊस भाषणावर शरद पवारांनी पहिल्यांदाच केला खुलासा! लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी पवारांनी साताऱ्यात सभा घेतली होती. त्या सभेच्यावेळी पावसानेही हजेरी लावली. सभा होईल की नाही अशी शंका कार्यकर्ते आणि इतर नेत्यांच्या मनात होती. मात्र पवारांनी त्या पावसाला अंगावर घेत कार्यकर्त्यांची मनं जिंकली. आणि सोशल मीडियावर पवारांचं हे पाऊस भाषण ‘तुफान’ व्हायरल झालं. त्या भाषणाने राष्ट्रवादीला मोठा आधार दिला. त्या भाषणावर इतर सगळे बोलले मात्र पवार फारसे बोलले नाहीत. निकाल लागल्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. इतर बातम्या - फटाक्यांची माळ लावताना स्कॉर्पिओने चिरडत लांबपर्यंत नेलं, अपघाताचा LIVE VIDEO शरद पवार म्हणाले, त्या दिवशी ढगाळ वातावरण होतं. पावसाची शक्यताही होती. मात्र ठरलेली सभा घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. बोलायला सुरुवात केली आणि पाऊस सुरू झाला. सुरुवातीला रिमझीम असणारा पाऊस वाढला आणि लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या. पाऊस थांबायला तयार नव्हता आणि लोक जायला तयार नव्हते. लोकांना भाषण ऐकायचं होतं. त्यामुळे मीही भाषण पूर्ण केलं. त्या भाषणाचा निश्चितच राष्ट्रवादीला फायदा झाला. हे भाषण फक्त साताऱ्यापुरता मर्यादीत न राहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं. इतर बातम्या - लेकीसमान सुनेवर सासऱ्याकडून बलात्कार, घटना समजताच सासूने कापली हाताची नस!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







