फटाक्यांची माळ लावताना स्कॉर्पिओने चिरडत लांबपर्यंत नेलं, अपघाताचा धक्कादायक LIVE VIDEO

फटाक्यांची माळ लावताना स्कॉर्पिओने चिरडत लांबपर्यंत नेलं, अपघाताचा धक्कादायक LIVE VIDEO

संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीचा उत्सव पाहायला मिळतो. पण या उत्सवाला दुर्घटनेमुळे गालबोल लागलं आहे.

  • Share this:

अमेठी, 29 ऑक्टोबर: आनंदानं दिवाळी साजरी होत असतानाच संध्याकाळी मात्र या उत्सवाच्या उत्साहाला गालबोट लागलं आहे. अमेठीमध्ये भरधाव स्कॉर्पिओने तरुणाला उडवलं तर औरंगाबादमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या म्हणून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हॅप्पी दीपावली बोलला म्हणून तरुणाची तलवारीने भोसकून हत्या करण्यात आली. तर दुसरीकडे भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे अपघात होऊन तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तिनही घटनांमुळे कुटुंबियांनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी रात्री दिवाळीचा उत्साह साजरा करण्यासाठी तरुणाने रस्त्यात लांबलचक माळ लावली आणि समोरून येणाऱ्या भरधाव स्कॉर्पियो गाड्यानं तरुणाला चिरडतं लांबपर्यंत फेकलं. दरम्यान दुर्घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना अमेठीतील मुंशीगंज रस्त्यावर घडली आहे.

भिवंडीमध्ये ऐन दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडल्याचा प्रकार घडला. खड्डयांनी पुन्हा एकाचा बळी घेतला आहे. दिवाळीच्या दिवशी हा अपघात झाला. खड्ड्यात बाईक आदळून राजेंद्र डोंगरे याला आपला जीव गमवावा लागला. एका महिन्यात वाडा रोडवर चौघांना जीव गमवावा लागला आहे. वारंवार तक्रार करुनही प्रशासनाकडून काहीच होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दिवाळीला गालबोट, Happy Diwali म्हटला म्हणून तरुणाची तलवारीने हत्या

दिवाळीत औरंगाबादमध्ये गालबोट लागलं आहे. औरंगाबादमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या म्हणून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हॅप्पी दीपावली बोलला म्हणून तरुणाची तलवारीने भोसकून हत्या करण्यात आली. हा सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ऐन सणाच्या दिवशी असा प्रकार औरंगाबादमध्ये घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.सचिन विष्णू वाघ असं हत्या झालेल्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. सचिनने आरोपीला हॅप्पी दीपावली असं म्हणत शुभेच्छा दिल्या आणि तोच आरोपीने रागात सचिनवर तलावारीने वार केले. शरीरावर अनेक धारदार तलवारीने वार झाल्यामुळे सचिनचा जागीच मृत्यू झाला.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 29, 2019, 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading