युतीच्या फॉर्म्युल्यावरून शिवसेनेची आक्रमक भूमिका, निवडणार दुसरा पर्याय?

युतीच्या फॉर्म्युल्यावरून शिवसेनेची आक्रमक भूमिका, निवडणार दुसरा पर्याय?

लोकसभा निवडणुकांमध्ये ठरवल्याप्रमाणे जर झालं नाही तर आम्ही दुसऱ्या पर्यायाचा विचार करू असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑक्टोबर : एकीकडं राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप-सेनेच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे युतीत सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. त्यात आता शिवसेनेनं सत्तेविषयी कठोर भूमिका घेण्याचं ठरवलं असल्याचं पाहायला मिळतं. लोकसभा निवडणुकांमध्ये ठरवल्याप्रमाणे जर झालं नाही तर आम्ही दुसऱ्या पर्यायाचा विचार करू असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. युती संदर्भात लोकसभा निवडणुकांआधीच निर्णय झाला आहे. त्यामुळे आता विधानसभेमध्ये यात बदल होणार नाही. भाजपने आम्हाला दिलेल्या आश्वासनाचं पालन करणे. जर तसं नाही झालं तर आम्ही दुसऱ्या पर्यायाचा विचार करू असा इशार संजय राऊत यांनी दिला आहे.

'आम्ही भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहोत. त्यामुळे लोक कोणत्या पातळीवर जातील हे आम्ही पाहत आहोत. आमची कोणतीही मागणी नाही आहे. तर फक्त लोकसभेवेळी ठरलेल्या निर्णयानेच पुढे जायचं इतकीच आमची मागणी असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता यावर भाजप काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर असं नाही झालं तर आम्ही वेगळा पर्याय निवडू असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

खरंतर, लोकसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे गोडवे गाणारे भाजप- शिवसेना युतीतीचे नेते आता एकमेकांविरोधात बोलू लागले आहेत. त्याचं कारण म्हणजे, भाजपला एकहाती सत्ता गाठता न आल्यामुळे शिवसेनेचं वजन वाढलं आहे.  सत्ता स्थापनेसाठी युतीमध्ये निवडणुकीच्या आधी निश्चित करण्यात आलेल्या 50-50 फॉर्म्युल्याचा पेच निर्माण झाला आहे. शिवसेना युतीच्या ठरलेल्या या फॉर्म्युल्यावरच सरकार स्थापन करायचे यावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजपने 15 ते 20 बंडखोर आमच्या संपर्कात आहेत असं म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेचा भाजपला सत्ता स्थापनेत फायदाच होत आहे. सत्ता स्थापनेत आपल्याला रस नसल्याचं सांगितल्यानं राज्यात वेगळी राजकीय गणितं जुळण्याची शक्यता मावळली. त्यामुळे आता सेनेला भाजपसोबतच जावं लागणार आहे.

इतर बातम्या - BREAKING : कॅप्टन कोहलीच्या जीवाला धोका, दहशतवाद्यांकडून धमकी

शिवसेनेसमोर पेच, भाजपशिवाय पर्याय नाही

निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा विचार करत नसल्याचे स्पष्ट केलं. तसेच विरोधी पक्षात बसू असंही त्यांनी सांगितलं होतं. यामुळे शिवसेनेची पंचाईत झाली असून त्यांना भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याशिवाय पर्याय नाही. 2014 मध्ये राष्ट्रवादीने सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. राज्यात मध्यावधी लागू नयेत यासाठी ही भूमिका घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

राज्यात भाजपने 105, शिवसेनेनं 56, राष्ट्रवादीने 54 तर काँग्रेसनं 44 जागी विजय मिळवला. अपक्ष, बंडखोरांसहीत इतर पक्षांतील उमेदवारांनी 28 जागा जिंकल्या आहेत. आता राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी कोणताच प्रयत्न करणार नाही अशी भूमिका घेतल्यानं शिवसेनेला भाजपसोबतच जावं लागेल. यात त्यांना पुन्हा तडजोड करावी लागू शकते. भाजपने त्यांच्या अटी मान्य न केल्यास सेनेसमोर दुसरा पर्याय शिल्लक नसेल.

इतर बातम्या - शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, कलम 370वरून म्हणाले...

सेना-भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची घेतली स्वतंत्र भेट

राष्ट्रवादीने भूमिका जाहीर केल्यानंतर शिवसेना जास्त काळ भाजपला अडवू शकणार नाही. त्यातच फक्त काँग्रेसचे संख्याबळही शिवसेनेसाठी पुरेसे नाही. अशा परिस्थितीत सरकार स्थापनेत अद्यापही राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. 50-50 फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर आता युती सरकारचं घोडं अडण्याची शक्यता आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेनेचे नेते दिवाकर रावते यांनी स्वतंत्रपणे राज्यपालांची भेट घेतल्यानं वेगळीच चर्चा रंगली आहे. ही भेट दिवाळीनिमित्त असली तरी सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्वाचं मानलं जात आहे.

इतर बातम्या - #SorrySujith : सुजीतची आयुष्याशी झुंज अपयशी, 3 दिवसानंतर मृतदेह हाती

Published by: Renuka Dhaybar
First published: October 29, 2019, 10:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading