लेकीसमान सुनेवर सासऱ्याकडून बलात्कार, घटना समजताच सासूने कापली हाताची नस!

लेकीसमान सुनेवर सासऱ्याकडून बलात्कार, घटना समजताच सासूने कापली हाताची नस!

बलात्कारासह कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 29 ऑक्टोबर : संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय संस्कृती जपणारा दिवाळीचा सण उत्सवात साजरा होत असताना नागपूरमध्ये मात्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये सासऱ्याकडून लेकीसारख्या सुनेवर बलात्कार करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पीडितेच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांत सासऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बलात्कारासह कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, धक्कादायक म्हणजे सुनेवर बलात्कार झाल्याचं समजताच सासूने हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या थोडक्यात जीव वाचला असून उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

इतर बातम्या - 1 नोव्हेंबरपासून लागू होणार नवे नियम, जाणून घ्या नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासऱ्याने कारमध्ये एका निर्जनस्थळी घेऊन जात सुनेवर बलात्कार केला. पोलिसांनी तिघा संशयित आरोपींपैकी मुख्य संशयित अशोक जाधवला अटक केली आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. तर सासऱ्यासह पती आणि सासू संशयित आरोपी असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर आता पोलीस संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत. तर पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - वर्षभरानंतर मुलगी सापडली तीदेखील पॉर्न साईटवर, आईनेच पाहिले फोटो आणि व्हिडिओ!

First published: October 29, 2019, 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading