जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'ठाकरे ब्रँड'वर नितेश राणेंचं सडेतोड उत्तर, 'छत्रपती शिवाजी महाराजां'वरुन केलं ट्वीट

'ठाकरे ब्रँड'वर नितेश राणेंचं सडेतोड उत्तर, 'छत्रपती शिवाजी महाराजां'वरुन केलं ट्वीट

'ठाकरे ब्रँड'वर नितेश राणेंचं सडेतोड उत्तर, 'छत्रपती शिवाजी महाराजां'वरुन केलं ट्वीट

संजय राऊतांनी ठाकरे ब्रँडवर केलेल्या वक्तव्यामुळे आता मसने आणि भाजपने यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 सप्टेंबर : कोरोना आधीच डोक्यावर असताना त्यात कंगना, मराठा आरक्षण आणि ड्रग्ज प्रकरण यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यात आता ‘ठाकरे ब्रँड’चीही भर पडली आहे. संजय राऊतांनी ठाकरे ब्रँडवर केलेल्या वक्तव्यामुळे आता मसने आणि भाजपने यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘मुंबई असो की महाराष्ट्र एकच ब्रॅन्ड छत्रपती शिवाजी महाराज….’ असं ट्वीट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी मसने आणि सेनेवर टीका केली आहे. कंगनाच्या प्रकरणावरून ‘‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली होती.

जाहिरात

त्यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ‘रातोरात जेव्हा मनसेचे नगरसेवक पळवले त्यावेळेस शिवसेनेनं काय केले? पाक कलाकार विरोध मनसेने आंदोलन केले, त्यावेळेस सेना कुठे होती आणि ठाकरे ब्रँड संभाळण्यास राज ठाकरे हे समर्थ आहे’, असा सणसणीत राऊतांना लगावला. पुणे लगतच्या ग्रामीण भागात परिस्थिती भीषण, बेड नसल्यामुळे तडफडून रुगाचा मृत्यू यानंतर आता नितेश राणे यांनीही यावर ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली आहे. ‘मुंबई असो की महाराष्ट्र एकच ब्रॅन्ड छत्रपती शिवाजी महाराज….’ असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलही चिंता व्यक्त केली. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल’ अशी चिंताही राऊतांनी व्यक्त केली होती. त्यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया पुढे येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात