Home /News /news /

पुणे शहरालगतच्या ग्रामीण भागात परिस्थिती भीषण, बेड नसल्यामुळे घरासमोर तडफडून रुग्णाचा मृत्यू

पुणे शहरालगतच्या ग्रामीण भागात परिस्थिती भीषण, बेड नसल्यामुळे घरासमोर तडफडून रुग्णाचा मृत्यू

पुण्यात सोमवारी 55 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 18 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सोमवारी 55 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 18 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

कोरोनाची तीव्र लक्षणं असलेल्या रुग्णांना वेळेत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळत नसल्याने पश्‍चिम हवेली तालुक्याची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

पुणे, 13 सप्टेंबर : पुण्यात कोरोनाचा विळखा सगळ्यात जास्त आहे. रोज नव्याने कोरोना रुग्णांची संख्या पुण्यात आणि ग्रामीण भागात वाढत आहे. अशाता आताही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खानापूर तालुक्यातील हवेली इथं गणेश तिकोने ( वय 40) या व्यक्तीचा योग्य उपचार व बेड अभावी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच किरकटवाडी इथं 70 वर्षीय प्रमोद कळंबे या वृद्धाचाही बेड न मिळाल्याने घरातच तडफडून त्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची तीव्र लक्षणं असलेल्या रुग्णांना वेळेत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळत नसल्याने पश्‍चिम हवेली तालुक्याची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. खानापूर इथं गणेश तिकोने या 40 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल 7 सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आला. नऱ्हे इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये तिकोने याला अॅडमिट करण्यात आलं. ऑक्सिजन पातळी अत्यंत खालावल्याने आणि श्‍वास घ्यायला त्रास होत असल्याने तातडीने व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. पण कोविड केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने गणेश तिकोने याला इतर ठिकाणी अॅडमिट होण्याचा सल्ला देण्यात आला. पुणेकरांचं टेन्शन वाढलं, कोरोनाच्या विळख्यात तयार झाला आणखी एक हॉटस्पॉट एका खासगी हॉस्पिटलमध्ये गणेश तिकोने याला दाखल करून घेण्यासाठी सुरुवातीलाच 20 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आल्याने तिकोने आणि त्याचा भाऊ दोघेही उपचार न घेताच घरी परतले. तिकोने याला उपचार मिळावेत म्हणून खानापूरचे सरपंच, पोलीस पाटील यांनी सरकारी यंत्रणांकडे पुरेपूर प्रयत्न केला. परंतु कोणतीही व्यवस्था न होऊ शकल्याने 8 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान गणेश तिकोने याने घरासमोरच तडफडून प्राण सोडला. मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठीही प्रशासनाने तब्बल 6 ते 7 तास कोणतीही दखल न घेतल्याने खानापूरचे सरपंच निलेश जावळकर, पोलीस पाटील गणेश सपकाळ, तरुण ओम तिकोने व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आदित्य धारूरकर यांनी पीपीई किट घालून गणेश तिकोने याच्यावर अंत्यसंस्कार केले. मुख्यमंत्री 1 वाजता जनतेशी थेट साधणार संवाद, ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्याचं लक्ष किरकटवाडी इथे एकटेच राहणारे प्रमोद कळंबे या 70 वर्षीय व्यक्तीलाही त्रास होत असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांसह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनीही बेड मिळविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांचाही काल 9 सप्टेंबर रोजी घरीच उपचारांअभावी तडफडून मृत्यू झाला. या दोन घटनांमुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था चव्हाट्यावर आली आहे. ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर युक्त बेड मिळत नसल्याने ज्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत तिथे संबंधित रुग्णालयांकडून अॅडमिट करण्याच्या अगोदरच पैशांची मागणी होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना पैशांअभावी आपला जीव गमवावा लागत आहे. या स्थितीमध्ये तात्काळ सुधारणा होणे पश्चिम हवेली तालुक्यासाठी अत्यंत आवश्यक बनले आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Pune, Pune news

पुढील बातम्या