मुंबई, 17 सप्टेंबर : मार्च महिन्यापासून राज्यात अजूनही लॉकडाऊन सुरू आहे. जनता कर्फ्यू लावूनसुद्धा कोरोनाचा धोका कमी होण्याचं नाव घेत नाही. अशात प्रत्येकाची आर्थिक बाजू लक्षात घेता आता राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत आहे. यादरम्यान, बससेवा सुरू करण्यात आली आहे. पण अद्याप रेल्वे सुरू न झाल्यामुळे विरोधक आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावरून थेट शासनाला इशारा दिली आहे. लवकर लोकल सेवा सूरू करा नाहीतर सविनय कायदेभंग करत लोकलने प्रवास करू असा इशारा संदीप देशपांडे यांनी केला आहे. लॉकडाऊन करताना शासनाने लोकांच्या वाहतुकीसाठी सोय केली नाही. नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. त्यांचे हाल कमी करण्यासाठी शासनाने लोकल सुरू करावी अन्यथा मी कायदा मोडेन असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.
रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल pic.twitter.com/B0R09IjW22
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 17, 2020
SSR प्रकरणात मुंबईत आलेली CBI टीम दिल्लीला रवाना, होणार महत्त्वाची बैठक राज्यात कोरोनापासून ते लॉकडाऊन आणि काय सुरू काय बंद यावर राजकारण सुरूच आहे. पण त्यासाठी अशा प्रकारे कायदा मोडण्याची भाषा मनसेकडून करण्यात आली आहे. खरंतर, आता राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत आहे. अनेक ऑफिसं आणि महत्त्वाची कार्यालयं सुरू झाली आहेत. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या लोकांची संख्याची वाढली. या सगळ्यात बस हे एकमेव प्रवास करण्याचं साधन असल्यामुळे प्रत्येक स्थानावर मोठी गर्दी पाहायला मिळते.
बसच्या गर्दीत करोना होत नाही पण रेल्वे च्या गर्दीत होतो असा सरकारचा समज आहे का?? pic.twitter.com/IJlWDwsTLa
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 17, 2020
चीनने पुन्हा एकदा रचला मोठा कट, मोदींपासून ते संपादकांपर्यंत सगळ्यांवर हेरगिरी अशात रेल्वे सुरू झाली तर प्रवाशांना त्याचा फायदाच होईल. पण जर रेल्वेतही लोकांची गर्दी वाढली तर मात्र कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यावर सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.