'कोरोनाचा लढा' हा राजकारणाचा विषय नाही, गिरीश महाजन यांचा शिवसेनेला टोला

'कोरोनाचा लढा' हा राजकारणाचा विषय नाही, गिरीश महाजन यांचा शिवसेनेला टोला

निसर्ग वादळामुळे कोकणात मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं 100 कोटींची मदत जाहीर केली. मात्र, ही मदत फार कमी असल्याचंही गिरीश महाजन यांनी यावेळी म्हटलं.

  • Share this:

नाशिक, 7 जून: राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच आहे.कोरोनाविरुद्ध लढा महत्त्वाचा आहे. पक्षभेद, जातीभेद, धर्मभेद विसरून आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. कोरोनाचा लढा हा राजकारणाचा विषय नाही, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

त्यात निसर्ग वादळामुळे कोकणात मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं 100 कोटींची मदत जाहीर केली. मात्र, ही मदत फार कमी असल्याचंही गिरीश महाजन यांनी यावेळी म्हटलं.

हेही वाचा... रुपेरी पडद्यावरील खलनायक ठरला हिरो, अभिनेता सोनू सूदवरून राजकारण पेटलं!

भाजपला केंद्रात सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगाने गिरीश महाजन यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसऱ्या कार्यकाळातही प्रभावी कामगिरी केली. अनेक

ऐतिहासिक निर्णय घेतले. कोणत्याही प्रकारची अराजकता न माजता काश्मीरला स्वायत्तता देणारं कलम 370 रद्द करून संपूर्ण देश अखंड केला. सार्वभौम नागरिकांसाठी ऐतिहासिक नागरिकत्व कायदा लागू केला. आता तर अयोध्येचा रामजन्मभूमी वाद देखील संपुष्टात आल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

देशातील जनतेनं स्पष्ट बहुमत दिल्यानं शेती, शेतकरी, कामगार, रोजगार, गरजूंना मदत, सैनिक, गरिबांना मोफत मेडिकल उपचार, शेतकऱ्यांना थेट खात्यात मदत, शेतमाल आणि व्यापार यांना मजबूत करणारे निर्णय, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर, कोट्यावधी लोकांना मोफत धान्य असे अनेक महत्त्वाचे निर्णय मोदी सरकारला घेता आले.

हेही वाचा... 'रडण्या'पलीकडे काय अपेक्षा ठेवणार, मनसेचा राऊतांना सणसणीत टोला

कोरोनाची दाहकता अजूनही कायम...

देशात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ निर्णय घेतल्यानं कोरोनावर उपाययोजना आपल्याला प्रभावी करता आल्या. जगभरात होत असलेल्या हानीच्या तुलनेत आपल्या देशात चांगली परिस्थिती असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

First published: June 7, 2020, 5:34 PM IST

ताज्या बातम्या