मुंबई, 7 जून: लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या परराज्यातील मजुरांना आपआपल्या गावी परत पाठवण्यासाठी अभिनेता सोनू सूदनं मदतीचा हात दिला. त्याच्या या कामाचं सर्वत्र कौतूकही झालं. प्रसारमध्यमांनी त्याच्या कामाची दखल घेतली. तर सोशल मीडियवर सोनू हिरो ठरला. पण आता यावरून राजकारण पेटलं आहे. काही राजकीय शक्तींनी राजकारणासाठी सोनू सूदचा प्यादा म्हणून वापर तर केला नाही ना? अशी शंका शिवसेनचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून उपस्थित केली गेली आहे.
हेही वाचा... रत्नागिरीला 75 कोटी तर सिंधुदुर्गास 25 कोटी, नुकसान भरपाईचे जुने निकष बदलणार
रुपेरी पडद्यावर खलनायक ठरला हिरो...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या परराज्यातील गोरगरिब मजुरांना गावी जाण्याची भ्रांत असताना सोनू सूद त्यांच्यासाठी धावून आला. त्यामुळं लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूडमधील या अभिनेत्याची सगळीकडचं चर्चा झाली. त्याच्या कामाची दखल खुद्द राज्यपालांनीही घेतली. आज बहुतेक मजूर मुंबई बाहेर पडला आहे. पण आता सोनूनं केलेल्या मदतीवरून राजकारण पेटलं आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सोनू सूदनं केलेल्या मदतीला राजकारणाची किनार असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच काही राजकीय शक्तींनी लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदचा प्याद्याप्रमाणे वापर तर केला नाही ना? असा रोखठोक सवाल 'सामना'तून संजय राऊत यांनी केला आहे.
लॉकडाऊच्या काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या शिताफीने आणि झपाट्याने कोणाला महात्मा बनवलं जाऊ शकतं? सूद याने म्हणे लाखो मजुरांना परराज्यात त्यांच्या घरी पोहचवलं. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीचं केले नाही का? असा मार्मिक सवाल सामनातून करण्यात आला आहे. सोनू सूदच्या निमित्तानं आता राजकीय कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपनं जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा...कोरोनाबाधित 82 वर्षांची आजी हॉस्पिटलमधून गायब; प्रशासनाची वाढली डोकेदुखी
राज्यात कोरोनाच्या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आधीपासूनचं संघर्ष पेटला असताना आता त्यात या नव्या वादाची भर पडली आहे. त्यामुळं आगामी काळात या मुद्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Sanjay raut, Shiv sena, Sonu Sood