जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'रडण्या'पलीकडे काय अपेक्षा ठेवणार, मनसेचा राऊतांना सणसणीत टोला

'रडण्या'पलीकडे काय अपेक्षा ठेवणार, मनसेचा राऊतांना सणसणीत टोला

'रडण्या'पलीकडे काय अपेक्षा ठेवणार, मनसेचा राऊतांना सणसणीत टोला

आपण अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय काम केलं? असा सवाल उपस्थितीत करत चांगल्या कामाचे कौतुक करण्याचा सल्ला दिला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 जून : अभिनेता सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्यास मदत करण्यावर शिवसेनेवर खासदार संजय राऊत यांनी आपल्या लेखातून सडकून टीका केली होती. त्यांच्या  टीकेनंतर मनसेनंही सोनू सूदची बाजू घेत संजय राऊतांना सणसणीत टोला लगावला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सोनू सूदने केलेल्या कामाचं कौतुक करून संजय राऊत यांच्या भूमिकाचा खरपूस समाचार घेतला आहे. अमेय खोपकर यांनी ट्वीट करून राऊत यांना चांगल्या कामाचे कौतुक करा, असा सल्ला दिला आहे. तसंच,  ‘या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहिण्या पलीकडे काय केलंत?  ज्याने काम केलंय त्याचं कौतुक करूया, मनाचा मोठेपणा दाखवूया. असो ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार’ असा टोलाही खोपकर यांनी लगावला.

जाहिरात

त्याआधी भाजपने नेते राम कदम यांनीही संजय राऊत यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.  ‘संजय राऊत यांचे लिखाण अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना अपयशी ठरली आहे. त्याचे पाप सोन सूदवर ढकलून लपवता येणार नाही, अशी टीका राम कदम यांनी केली.

तसंच, ‘जे काम महाराष्ट्र सरकारचे आहे. ते काम सरकारने केले नाही. सोनू सूद सारखा अभिनेता रस्त्यावर उतरून स्वत:च्या खिश्यातील पैसे खर्च करून गरिबांना मदत करत असले तर त्यावर टीका करणे ही संस्कृती आहे का? शिवसेनेचे नेते असे करणार आहे का? असा सवालही कदमांनी केला. काय म्हणाले होते राऊत? दरम्यान, संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या रविवारच्या पुरवणीतील रोखठोक सदरात अभिनेता सोनू सूदवर सडकून टीका करत भाजपवर निशाणा साधला. हेही वाचा - दोन लहान मुली झाडाखाली खेळत होत्या, पिसाळलेल्या लांडग्याने घेतली झेप, आणि… ‘राज्याराज्यांची सरकारे या स्थितीत हतबल झालेली मी पाहिली. मजूर चालतच निघाले व लाखो मजूर बिहार, उत्तर प्रदेशच्या सीमेवर जाऊन रखडले. त्यांना तेथे घोटभर पाणीही मिळत नव्हते. सोनू सूद त्या भुकेल्यांच्या खवळलेल्या गर्दीत पोहोचले नाहीत. हे लाखो लोक तेथे पोहोचले ते काय फक्त सोनू सूदने खास व्यवस्था केलेल्या बस, रेल्वेने?  ‘‘कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल,’’ असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काही करत नाही, पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला’ असा आरोपही राऊत यांनी केला. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात