मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

परळीकरांचा नाद खुळा! बाळासाहेबांनंतर थेट धनंजय मुंडेंसाठी उभारली सोन्याची कमान

परळीकरांचा नाद खुळा! बाळासाहेबांनंतर थेट धनंजय मुंडेंसाठी उभारली सोन्याची कमान

परळीत 1989 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत अशीच सोन्याची कमान लावून करण्यात आले होते.

परळीत 1989 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत अशीच सोन्याची कमान लावून करण्यात आले होते.

परळीत 1989 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत अशीच सोन्याची कमान लावून करण्यात आले होते.

बीड, 10 जानेवारी : सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच धनंजय मुंडेचा परळी शहरात नागरी सत्कार होत आहे. या निमित्त परळीत सर्व ठिकाणी सजावट करण्यात आली. मात्र या संपूर्ण सजावटीत लक्ष वेधून घेतले ते सुवर्ण अलंकार कमानाने. या कमानीचे विशेष म्हणजे यात सोन्याचे दागिने लावले होते. त्यामुळे परळीकरांचा नाद खुळाच म्हणावं लागेल. परळी शहरातील सोनारलाइन रोडवर चक्क सुवर्ण अलंकार कमान उभारली आहे. या कमानीवर सोन्याचे अलंकार लावण्यात आले आहेत अशी माहिती सुवर्णकार समाजाचे नेते सुरेश टाक यांनी दिली आहे. यापूर्वी परळीत 1989 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत अशीच सोन्याची कमान लावून करण्यात आले होते. मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वागत सोन्याची कमान लावून करण्यात येत असल्याने हे लक्षवेधी ठरत आहे. इतर बातम्या - उपाशी लेकरांचं पोट भरण्यासाठी मातेनं केलं मुंडन, पहिले विकत घेतलं जेवण नंतर विष परळी शहरातील आगळ्या-वेगळ्या स्वागतासाठी उभारलेल्या कमानीवर विशिष्ट अलंकार आहेत. सोन्याची एकदाणी, पट्टी गंठण, रानी हार, नेकलेस, चैन पट्टी, माणिक-मोती गल सर हे लावण्यात आले आहेत. प्रत्येक अलंकार पाच तोळ्यांचा असून शहरातील सर्व सुवर्णकार बांधवाकडून हे जमा करून लावण्यात आले आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून खाजगी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. याशिवाय शहरात क्रेनद्वारे दीड क्विंटल वजनाचा पुष्पहार घालून ही स्वागत करण्यात आले. तसेच फटाक्यांची अतेष बाजी आणि डोळे दिपवणारा क्षण परळी कर अनुभवत होते. मिरवणुकीत राजस्थान, केरळ, जयपूर, आणी कोल्हापूरचे बॅण्ड पथक आणि लेझीम पथक होते. यामुळे शाही मिरवणुकीची रंगत वाढवली. इतर बातम्या - अजिंक्य रहाणेनं शेअर केला वडापावसोबत फोटो, सचिननं ‘मुंबईकर’ स्टाईल दिले उत्तर
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Dhananjay munde, Election 2019, Maharashtra, NCP, राष्ट्रवादी, शरद पवार

पुढील बातम्या