उपाशी लेकरांचं पोट भरण्यासाठी मातेनं केलं मुंडन, पहिले विकत घेतलं जेवण नंतर विष...!

उपाशी लेकरांचं पोट भरण्यासाठी मातेनं केलं मुंडन, पहिले विकत घेतलं जेवण नंतर विष...!

31 वर्षीय प्रेमा नावाच्या महिलेला उपासमारीमुळे त्रास होऊ लागला, तेव्हा तिने भूक भागवण्यासाठी डोक्याचे केस विकले. परंतु...!

  • Share this:

चेन्नई, 10 जानेवारी : उपासमारीमुळे मृत्यूला गळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कुटुंबाचं धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना तामिळनाडूच्या (Tamil Nadu)  सालेम (Salem)शहराची आहे. येथे राहणाऱ्या 31 वर्षीय प्रेमा नावाच्या महिलेला उपासमारीमुळे त्रास होऊ लागला, तेव्हा तिने भूक भागवण्यासाठी डोक्याचे केस विकले. परंतु तिला माहित होते की यामुळे तिला इतके पैसे मिळणार नाहीत जेणेकरुन ती दररोज तिच्या मुलांना खायला देऊ शकेल. तर केस विकून तिला मिळालेल्या 150 रुपयांत, 100 रुपयांत तिने मुलांसाठी अन्न विकत घेतले आणि 50 रुपयांत विष विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर असे काही घडले की आता तिचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे.

खरंतर प्रेमा आणि तिचा नवरा सेल्वम वीट भट्ट्यात काम करत होते. सेल्वमला स्वत: चा व्यवसाय सुरू करायचा होता, म्हणून त्यांनी अडीच लाख रुपये घेवून हा व्यवसाय सुरू केला. त्याचा व्यवसाय चालू होताच संपूर्ण कुटुंबाला त्रासांचा डोंगर सहन करावा लागला. यानंतर सेल्वमने आत्महत्या केली. आता प्रेमावर तिन्ही मुलांची जबाबदारी आहे. प्रेमाच्या तीन मुलांपैकी एकाचे वय 5 वर्ष आहे, दुसरे तीन वर्षांचे व तिसरे दोन वर्षांचे आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गेल्या शुक्रवारी तिच्याकडे मुलांना खायला घालायला पैसेही नव्हते. तिने बर्‍याच लोकांकडून पैसे घेतले पण कोणीही तिला मदत केली नाही.

इतर बातम्या - Government Job : RBI मध्ये नोकरीच्या संधी, या तारखेआधी करा अर्ज

केसांचे विग बनवणाऱ्याने दिली केस विकण्याची ऑफर

प्रेमा तिच्या नातेवाईकांकडून पैसे मागण्यासाठी गेली असता तिला एक व्यक्ती आढळली जी केसांचं विग विकण्याचं काम करत होती. त्या व्यक्तीने प्रेमाला सांगितले की, जर तिने केस दिले तर तो तिला पैसे देऊ शकतो. यानंतर, प्रेमाने आपले केस कापले. त्या बदल्यात तिला अवघे दीडशे रुपये मिळाले. प्रेमाने 100 रुपयांत अन्न विकत घेतले आणि 50 रुपयांत विष खरेदी करायला गेली. पण दुकानदाराला तिचा संशय आला आणि त्याने विषारी औषध देण्यासाठी नकार दिला.

इतर बातम्या - मुलांना सांगितलं माझ्याकडे पाहू नका, तोपर्यंत आईने केला बॉयफ्रेंडसोबत SEX

प्रेमाने विषारी वनस्पतींचे बिया खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या बहिणीने तिला वाचवले. ही कथा तामिळनाडूतील ग्राफिक डिझायनर जी. बाला यांना समजली. सोशल मीडियावर त्यांनी प्रेमासाठी निधी गोळा करण्याची मोहीम सुरू केली. या मोहिमेच्या माध्यमातून प्रेमाने आतापर्यंत 1.45 लाख रुपये जमा केले आहेत. सालेमच्या जिल्हा प्रशासनानेही त्यांची विधवा पेन्शन सुरू केली आहे. यासह, तिला आता वीटभट्टीमध्ये काम मिळाले आहे.

इतर बातम्या - अजिंक्य रहाणेनं शेअर केला वडापावसोबत फोटो, सचिननं ‘मुंबईकर’ स्टाईल दिले उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2020 10:02 PM IST

ताज्या बातम्या