राज्यात काँग्रेसचं सत्ताकेंद्र बाळासाहेब थोरातच, अशोक चव्हाणांना मागे टाकत ठरले 'नंबर एक'

राज्यात काँग्रेसचं सत्ताकेंद्र बाळासाहेब थोरातच, अशोक चव्हाणांना मागे टाकत ठरले 'नंबर एक'

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षावर प्रतिकूल परिस्थिती असताना ते टिकवणं हे मोठ आव्हान होतं ते थोरात यांनी पार पाडलं.

  • Share this:

मुंबई, 05 जानेवारी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हेच राज्यातील प्रमुख नेतृत्व असतील हे काँग्रेस दिल्ली हाय कमांडनी आज खातेवाटपावरून जवळपास स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीच्या शिवाजी पार्क येथील शपथविधीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात पहिल्या लिस्टमध्ये होते. थोरात हे दिल्ली हाय कमांडच्या गेल्या काही काळात अत्यंत विश्वासू म्हणून जवळ गेले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तयार होण्यात दिल्ली हायकमांड राज्यातली काँग्रेस नेत्यांचा यात समन्वय करण्याचं काम थोरात यांनी केलं.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षावर प्रतिकूल परिस्थिती असताना ते टिकवणं हे मोठ आव्हान होतं ते थोरात यांनी पार पाडलं. अनेकजण पक्ष सोडत असताना काँग्रेस एकनिष्ठ राहून दिल्लीशी समन्वय करत प्रदेशाध्यक्षपद योग्य सांभाळल्याने थोरात यांच्यावर दिल्ली हाय कमांडचा अधिकच विश्वास दृढ झाला. थोरात यांना गेल्या काही वर्षात राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष पदावर असताना राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या होत्या. त्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी संधी देणे तसंच गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून मुख्य जबाबदारी देणं या सर्व गोष्टींमुळे राहुल गांधी घराण्याची त्यांचे संबंध अधिक चांगले झाले.

इतर बातम्या - प्रितम मुंडे झाल्या चक्क 836 मुलींच्या आत्या, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण

प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी संगमनेर येथे आले असताना थोरात यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांनी मुक्काम केला होता. गांधी घराण्यातील एखाद्या व्यक्ती काँग्रेसच्या नेत्याच्या घरी मुक्काम करतो हे भविष्यातील मोठी संधी देण्याचे संकेत त्यावेळेस राहुल गांधी यांनी दिले होते. वादग्रस्त विधानं कमी करणे तसेच दिलेली जबाबदारी गाजावाजा न करता पार पाडणे यात थोरात यांच्या शैलीने दिल्ली हाय कमांड यांनी आता परत एकदा राज्यात थोरात यांच्याकडेच कॉंग्रेसचे मुख्य नेते म्हणून भविष्यकाळातल्या संकेत दिले आहेत.

इतर बातम्या - 'मातोश्री'बाहेरील शेतकऱ्याला भेट नाकारल्यानंतर बच्चू कडू यांचा सरकारला घरचा अहेर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद त्याचवेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी संधी आणि राज्यातील महसूल खात्यात सारखे वजनदार जबाबदारी असणाऱ्या खातं थोरात यांना दिले. यामुळे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसमध्ये थोरात यांच्यावर दिल्लीचा अधिक विश्वास असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. थोरात हेच राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते असल्याचेही दिल्ली हाय कमांड यांनी संकेत दिले आहेत. आता महाविकास आघाडी सत्तेत नंबर तीन जरी पक्ष राहिला असला तरी समविचारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला तोंड देत विचारांची चौकट मोडून शिवसेनेबरोबर योग्य ठिकाणी हात मिळवणे तर योग्य ठिकाणी दोन हात करत काँग्रेस पक्ष कसा वाढणार यावर एकदा राज्यात काँग्रेसला उभारी देण्याचं आव्हान थोरात यांच्यासमोर आहे.

इतर बातम्या - अब्दुल सत्तारांनी सोडलं मौन, म्हणाले 'मी शिवसैनिक', राजीनाम्याची पुडी सोडली कोणी

Published by: Renuka Dhaybar
First published: January 5, 2020, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading