बीड, 05 जानेवारी : राजमाता जिजाऊ, सावित्रीच्या पुरोगामी महाराष्ट्रात स्त्री जन्माचं आनंदने स्वागत करणारी ही सुखद बातमी आहे. एकाच मांडवात तब्बल 836 मुलींच्या बारशाचा कार्यक्रम पार पडला. मंजुळ संगीताच्या तालात झूलणारे पाळणे, पाहुण्यांची गडबड अशा जक्कास वातावरणात नामकरण सोहळा बीड शहरात पार पडला. यात विशेष म्हणजे खासदार प्रितम मुंडे यांनी आत्याची भूमिका पार पाडली.
एका बाळाचे बारसे कदाचित आपण पाहिले असेल पण बीडमध्ये तब्बल 836 नुकत्याच जन्मलेल्या कन्यारत्नांच्या बारशाचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. एकाच मांडावाखाली तब्बल 836 मुलींचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम सगळ्यांनी याची देही याची डोळा पाहिला. मुलींच्या जन्माचे असे स्वागत बघीतल्यावर तुम्हीही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत.
एकाचवेळी तब्बल 836 पाळण्यात खेळणाऱ्या चिमुकल्या...
व्यासपीठावरून गायली जाणारी बारशाची गीते, अन् गर्दीने फुलून गेलेल्या सभामंडपात नातेवाईकांना वाटली जाणारी मिठाई. हे चित्र बीड शहरातील स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणच्या 16 व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाच्या मंडपात दिसलं. कन्यारत्नांच्या सामुहिक नामकरण सोहळ्यात..! 'स्त्री जन्माचे स्वागत करा', 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या राष्ट्रीय उपक्रमातंर्गत जिल्हा रुग्णालय प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या पुढाकारातून सप्टेंबर ते डिसेंबर 2019 या कालावधीत जन्मलेल्या तब्बल 836 मुलींच्या नामकरणाचा हा सोहळा पार पडला.
इतर बातम्या - 'मातोश्री'बाहेरील शेतकऱ्याला भेट नाकारल्यानंतर बच्चू कडू यांचा सरकारला घरचा अहेर
हे प्रतिष्ठानचे तिसरे वर्ष आहे. या विश्व विक्रमाची नोंद गोल्डन बुक व वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. याप्रसंगी बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे ‘वंडर बुक रेकॉर्ड’च्या भारतातील हैद्राबाद येथील समन्वयक डॉ. स्वर्ण श्री गुराम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. प्रतिभा थोरात यांची उपस्थिती होती.
‘मेरी घर आयी नह्नी परी’
स्त्री जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून बीडची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख झाली. या कार्यक्रमात मला आत्या नाही तर मावशी म्हणून यायला आवडेल असं यावेळी बोलताना प्रितम मुंडे म्हणाल्या. यावेळी 836 मुलींचे पाळणे हलवण्यात आले. मुलींच्या आत्यांनी मुलींना कानात सूचवल्याप्रमाणे नामकरण झालं. आपल्या मुलीचा इतका सुंदर आणि अनोखा नामकरण सोहळा पार पडत असताना मुलींच्या आईच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
इतर बातम्या - व्यक्तीवर प्रेम पण नाकाने केला घात! नवरीने असं काही केलं की नवरा पोहोचला कोर्टात
या नामकरण सोहळ्यास मुलींचे कुटुंबीय आणि नातेवाईकही आर्वजून उपस्थित राहिले होते. इतर वेळी चार भिंतीच्या आत होणार्या बारशाला घरातील लोक आणि आप्तेष्ट उपस्थित असतात. बीडमध्ये मात्र हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मुलीचा नामकरण सोहळा पडल्याने या मातांचा आनंद गगणात मावत नव्हता. यावेळी ‘मेरी घर आयी नह्नी परी’ ‘मोगरा फुलला’ ‘छोटी सी नन्ही सी प्यारी सी आयी परी’ हे आणि बारशाची गीते सादर केली गेली.
मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आरोग्य यंत्रणेचं मोठं योगदान
1 हजार मुलांमागे 810 मुली होत्या, मात्र आरोग्य यंत्रणेनं बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमाची चांगली अंमलबजावणी केली. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने चांगले काम केले. त्यामुळे आज 2018-19 मध्ये मुलींचा 1 हजार मुलांमागे जन्मदर 961 वर पोहचला हे मोठे यश आहे. एकाच मांडवात मुलींच्या सामुहिक नामकरणाचा सोहळा घेताना समाधानाची प्राप्ती होते असे सागंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड म्हणाले की, पुढच्या वर्षी 1001 मुलींच्या नामकरण सोहळा करणार असल्याचा संकल्प आहे.
इतर बातम्या - सापाने कात टाकल्याचा लाईव्ह व्हिडिओ TikTok वर व्हायरल, तुम्हीही पाहून थक्क व्हाल मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.