मुंबई, ता, 21 जून : अमेरिकेतला वाढलेला आरोग्य खर्च कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंपनीच्या प्रमुखपदी डॉ. अतुल गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅमेझॉन, बर्कशायर हॅथवे आणि जेपी मॉर्गन या दिग्गज कंपन्यांनी मिळून ही नवीन कंपनी स्थापन केली आहे. डॉ. अतुल हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. अमेरिकेत उपचार घेणं हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. आरोग्य विमा असल्याशीवाय तिथे उपचार घेणंच शक्य होत नाही. या महागड्या वैद्यकीय सेवेचा प्रचंड ताण सामान्य नागरिकांवर पडत असतो. तो ताण कमी करण्याची मोठी जबाबदारी डॉ. गावंडे यांना पार पाडावी लागणार आहे. International Yoga Day : डेहराडूनमध्ये मोदींनी तर मुंबईत मुख्यमंत्र्यांनी केला योग पंतप्रधानांच्या पत्नी म्हणाल्या, ‘मोदींनी माझ्याशी लग्न केलं होतं, ते माझ्यासाठी राम आहेत’ डॉ. अतुल गावंडे हे विख्यात सर्जन असून सर्जनशील लेखकही आहेत. त्यांची अनेक पुस्तकं ही जगातली बेस्टसेलर पुस्तकं ठरली आहेत. पब्लिक हेल्थ म्हणजेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि खास अभ्यासाचा विषय आहे. यावर त्यांचं संशोधनही सुरू असतं. ही पार्श्वभूमी असल्यानेच त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आल्याचं या तीनही कंपन्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या बोस्टन शहरात या नव्या कंपनीचं मुख्यालय राहणार आहे. कोण आहेत डॉ. अतुल गावंडे?
डॉ. अतुल गावंडे हे विख्यात सर्जन असून बोस्टनच्या ब्रिगहॅम अँड वुमन्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.
हारर्वड युनिव्हर्सिटीच्या पब्लिक हेल्थ विभागात प्राध्यापक
जगप्रसिद्ध द न्यू यॉर्कर मॅगझिनचे 1989 पासून लेखक
सार्वजनिक आरोग्य या विषयावरचं त्यांचं संशोधन जगभर गाजलं
गाजलेली पुस्तकं - द चेकलिस्ट मेनिफॅस्टो, कॉम्पिकेशन्स, बीईंग मॉर्टल आणि बेटर
ना घोडा, ना गाडी, थेट जेसीबीतून घरी आणलं नवरीला !
मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी सुरू केलेले योगाभ्यास मंडळ बंद करण्याचे आदेश
भारताशी नातं विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेडजवळचं उटी हे लहानसं खेडं हे डॉ. गावंडे यांचं मुळं गाव. 1960 च्या दशकात डॉ. अतुल गावंडे यांचे वडील आत्माराम गावंडे हे अमेरिकेत गेले आणि तिथेच स्थायिक झाले. डॉ. अतुल यांचा जन्म अमेरिकेचा असला तरी त्यांची भारताची ओढ आणि आपल्या गावाशी असलेलं नात अजुनही कायम आहे. उमरखेड इथं असलेल्या गोपीकाबाई गावंडे महाविद्यालयाला गावंडे कुटूंबियांकडून दरवर्षी मदत मिळत असते.