कर्नाटक, 21 जून : भारतीय लग्नपद्धतीनुसार तुम्ही नेहमी पाहिलं असेल की, नवरा आणि नवरी हे घोड्यावरून किंवा आजकल गाडीत वरात काढतात. पण कर्नाटकच्या एक नव्या दांपत्याने एक अनोखी स्वारी केली आहे, आणि सगळ्यांना दाखवून दिलं की आमच्यापेक्षा वेगळं कोणीच नाही. कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नडच्या पुतुरमध्ये चेतनने त्याची पत्नी ममताला कोणत्या महागड्या कारमध्ये नाहीतर एका जेसीबी गाडीत बसून घरी आणलं. हो, जेसीबीच का असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, तर त्याच कारण असं की चेतन हा जेसीबी ऑपरेटर आहे.
हेही वाचा…
पंतप्रधानांच्या पत्नी म्हणाल्या, ‘मोदींनी माझ्याशी लग्न केलं होतं, ते माझ्यासाठी राम आहेत’
बिल्डिंगमध्ये पाणी सोडले नाही म्हणून सेक्रटरीने वाॅचमनची केली हत्या
बिग बाॅसच्या घरात ‘हुकुमशहा’ नंदकिशोर असा का वागला ?
रोजचा उदरनिर्वाह करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चेतन हा जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करतो. त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या या सुंदर क्षणी त्याने त्याच्या पत्नीसह जेसीबीतून वरात काढली आणि तिला घरी नेलं. न्यूज 18 शी बोलताना चेतन म्हणाला की, ’सुरूवातीला ममता जेसीबीमध्ये बसण्यासाठी लाजत होती. पण मी समजवल्यानंतर ती तयार झाली.’ खरंतर आपल्या कामावर इतकं प्रेम करणं आणि आपल्याला मदत करणाऱ्या वस्तूंचा असा आदर करणं हे प्रत्येकाला जमणं शक्यच नाही, जे चेतनने करून दाखवलं चेतन पुढे म्हणाला की, ‘जेसीबीमधून जाणं हे काही मी आधीपासून ठरवलं नव्हतं. लग्न मंडपातून बाहेर निघताना माझ्या मनात हा विचार आला.’ अगदी लग्नाच्या गाडीसारखं सजवलेल्या या जेसीबीमध्ये चेतन आणि ममताचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.