पंतप्रधानांच्या पत्नी म्हणाल्या, ‘मोदींनी माझ्याशी लग्न केलं होतं, ते माझ्यासाठी राम आहेत’

आनंदीबेन पटेल यांच्या भाषणामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांना अविवाहित असल्याचं म्हटलं होतं. त्यावर जसोदाबेन यांनी वक्तव्य केलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2018 09:39 AM IST

पंतप्रधानांच्या पत्नी म्हणाल्या, ‘मोदींनी माझ्याशी लग्न केलं होतं, ते माझ्यासाठी राम आहेत’

मुंबई, 21 जून : नरेंद्र मोदी माझ्यासाठी राम आहेत असं पंतप्रधानांच्या पत्नी जसोदाबेन यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून दूर राहत असलेल्या त्यांच्या पत्नी जसोदाबेन यांनी मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे.

आनंदीबेन पटेल यांच्या भाषणामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांना अविवाहित असल्याचं म्हटलं होतं. त्यावर जसोदाबेन यांनी वक्तव्य केलं आहे.

आनंदीबेन यांच्या विधानावर आक्षेप घेत जसोदाबेन म्हणाल्या की, ‘एक शिक्षित महिलेने एका शिक्षिकेबद्दल असं बोलण म्हणजे अयोग्य आहे. त्यांच्या या विधानामुळे भारताच्या पंतप्रधानांच्या प्रतिमेला ठेच लागली आहे. पण मोदी हे माझ्यासाठी आदरणीय आहेत. आणि ते माझे राम आहेत.’

International Yoga Day : डेहराडूनमध्ये मोदींनी तर मुंबईत मुख्यमंत्र्यांनी केला योगा

एका गुजराती वृत्तपत्राच्या मुलाखतीत मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन यांनी दावा केला होता की, पंतप्रधान मोदी हे अविवाहित आहेत. त्यांच्या या खळबळजनक विधानानंतर जसोदाबेन यांनी त्यांच्या भावाच्या मोबाईवरून एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

Loading...

या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या की, ‘नरेंद्र मोदी अविवाहित आहेत या आनंदीबेन यांच्या वक्तव्यामुळे मला धक्काच बसला आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणूकांचा अर्ज भरताना मी विवाहित असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. त्या अर्जात त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख देखील केला आहे. त्यामुळे आनंदीबेन सारख्या शिक्षित महिलेने माझ्यासारख्या एका शिक्षिकेविषयी असं बोलणं अयोग्य आहे.’

दरम्यान, आनंदीबेन यांनी केलेलं वक्तव्य हे खोट आहे हे सांगण्यासाठी मला हा व्हिडिओ शेअर करावा लागला. पण मोदी हे माझ्यासाठी आदरणीय आहेत. आणि ते माझे राम आहेत असं जसोदाबेन म्हणाल्या आहेत.

 

हेही वाचा...

ही आहे सुर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत !

InternationalYogaDay2018 : या फिट सेलिब्रिटींचा हा आहे फिटनेस फंडा !

InternationalYogaDay2018 : योग दिनानिमित्त जगभरात योग्याभ्यास

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2018 09:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...