कोरोनाविरुद्ध लढा निर्णायक वळणावर, सर्वांनी 'मा' कसम घ्यावी, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोनाविरुद्ध लढा निर्णायक वळणावर, सर्वांनी 'मा' कसम घ्यावी, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोकणाला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येवू देणे ही प्राथमिकता आहे'

  • Share this:

रत्नागिरी, 18 ऑक्टोबर : 'कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी 'मा कसम' सर्वांनी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पाहिला जिल्हा ठरला आहे.

'कोकणाला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येवू देणे ही प्राथमिकता आहे.  कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा  प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बाप आणि 4 वर्षांच्या मुलाचा महामार्गावर आक्रोश, मनसुन्न करणारा VIDEO

'माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे. याच पद्धतीने आगामी काळात जाणीवर जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की, मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता याबाबत प्रत्येकापर्यंत जागृती करा, असं निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

प्लाझ्मा अफेसेसिस युनिट मलेरिया, डेंग्यू तसेच इतरही अनेक आजारात मदत करणार आहे. यासाठी लागणारी यंत्रे 1 ते 2 लाखात येतील ती खरेदी करुन यातून कायमस्वरुपी उपचार व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, असे आरोग्यमंत्री टोपे याप्रसंगी म्हणाले. रत्नागिरीत घराघरापर्यत पोहोचून आरोग्ययंत्रणा व जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी केली याबद्दल त्यांनी अभिनंदन देखील यावेळी केले.

अरे! पुण्यात अख्खा बसस्टॉपच गेला चोरीला; शोधून दिल्यास मिळणार बक्षीस

दरम्यान, 'रोज 35 ते 40 रुग्ण पॉझिटिव्ह होणाऱ्या  रत्नागिरी तालुक्यासह लगत माझ्या मतदार संघात आता आकडा शुन्यावर आला. यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम व जिल्हा प्रशासन यांचे यश आहे .असे सांगून  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपण लवकरच या प्लाझमा उपचार सुविधेतून मृत्यूदर देखील एक टक्क्यांच्या खाली नेऊ असा विश्वास व्यक्त केला.

माझ्याकडे कौतुकाचे अभिनंदानाचे शब्द कानावर येतात त्यावेळी त्यामागे आपली मागणी केलेली असते. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यासाठी सर्व अटींची पूर्तता करा. रायगड आणि सिंधुदूर्गात दिलंय तसंच ते तुम्हालाही देवू, असं आश्वासनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

Published by: sachin Salve
First published: October 18, 2020, 4:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading