पुणे, 18 ऑक्टोबर : पुणे तिथे काय उणे, असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. पुण्यात काहीही अशक्य नाही. जगभरात पुण्यातील पाट्या प्रसिद्ध आहेत. दुकानांबाहेर अगदी घराबाहेर लावलेली पुण्यातील पाटीबद्दल अनेकांना उत्सुकता असता. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील फोटो व्हायरस झाला असून यावर पुण्यातील एक बस स्टॉप चोरीला गेल्याचे लिहिण्यात आले आहे. पुण्यातील बी. टी. कवडे रोडवरील देवकी पॅलेससमोरील बस स्टॉप चोरीला गेल्याचा दावा या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय जो कोणी हा बस स्टॉप शोधून देईल त्याला 5000 रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्यात काय चोरीला जाईल त्याचा काही नेम नाही. हे ही वाचा- परीक्षा सुरू असताना पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार?
Yeah. I was the one who posted it to reddit. Please cite for more context https://t.co/YCfPR3y9jN
— Sudhakar Verma (@_sudhackar) October 17, 2020
हा फोटो reddit युजर u/ Sudhackar यांनी शेअर केला आहे. सुधाकर यांचा reddit.com वरील हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. एकाने तर पुणे तिथे काय उणे.. अशी कमेंट केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी या घटनेकडे गमतीनं घेतला तर अनेक जणांनी यावर चीड व्यक्त केली आहे. या फोटोवरुन बी.टी. कवडे रोडवरील देवकी पॅलेससमोरील बस स्टॉप चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. हा बस स्टॉप शोधून देणाऱ्यांना पाच हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. हे पोस्टर राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत म्हस्के यांनी लावले आहे.