बाप आणि 4 वर्षांच्या मुलाचा महामार्गावर आक्रोश, मनसुन्न करणारा VIDEO

बाप आणि 4 वर्षांच्या मुलाचा महामार्गावर आक्रोश, मनसुन्न करणारा VIDEO

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.

  • Share this:

प्रवीण तांडेकर, प्रतिनिधी

गोंदिया, 18 ऑक्टोबर : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मासुलकसा घाटाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पती आणि चार वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला आहे.

मृतकांचे नाव दुर्गा वर्मा असं आहे. दुर्गा वर्मा या आपल्या पती व मुलासोबत आज सकाळी नागपूरवरून छत्तीसगड राज्यातकील राजनांदगाव येथे जाण्यासाठी निघाले होते.

देवरी तालुक्यातील मासूलकसा घाटात पोहचता एका अज्ञात ट्रक चालकाने वर्मा यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली.  ट्रकने धडक दिल्यानंतर बाईकचे संतुलन बिघडल्याने वर्मा हे बाइकसह खाली कोसळले. बाइकवर मागे बसलेल्या दुर्गा वर्मा या खाली पडल्यामुळे  ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर  ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

2 घरांमध्ये एकामागोमाग स्फोट आणि भीषण अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

घटनास्थळी वर्मा हे आपल्या चिमुरड्या मुलासह टाहो फोडत असल्याचे पाहून उपस्थितीच्या डोळ्यात पाणी आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे.

बेपत्ता 2 वर्षांच्या प्राचीचा विहिरीत आढळला मृतदेह

दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी धुळे जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. निमगुळ या गावांमध्ये प्राची प्रवीण महाजन ही दोन वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. घरच्यांनी तिचा शोधाशोध केला, मात्र आज सकाळी तिचा मृतदेह निमगूळ शिवारातील एका विहिरीत तरंगतांना आढळला. दोन वर्षांच्या प्राचीचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन वर्षांच्या प्राचीचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

राज्यपाल नियुक्त सदस्यांची राज्यपालांकडे पाठवणार यादी, 'त्या' पत्रामुळे ठाकरे सर

प्राचीचा मृतदेह हा शवविच्छेनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  शवविच्छेदनात अधिक माहिती समोर येईल, असे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राची आणि तिचे कुटुंबीय  घरात झोपले असताना दार उघडून  कोणीतरी तिला उचलून नेल्याची चर्चा आहे.  या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राचीचा मृत्यू हा घातपात आहे? की नरबळी देण्याचा प्रयत्न आहे याबाबत तपास सुरू आहे.

Published by: sachin Salve
First published: October 18, 2020, 2:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading