Home /News /news /

'या' बँकेमध्ये Saving अकाऊंट उघडणाऱ्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का!

'या' बँकेमध्ये Saving अकाऊंट उघडणाऱ्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का!

या बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे खातेधारकांना मोठा धक्का बसला आहे.

    नवी दिल्ली, 12 जून : पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि एसबीआय (State Bank of India) या देशातील सगळ्यात मोठ्या बँकांनंतर आता IDBI बँकेने असा काही निर्णय घेतला आहे, ज्यामुळे खातेधारकांना मोठा धक्का बसला आहे. आयडीबीआयने बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यात बँकेनं बचत बँक खात्यातील व्याजदरात 0.20 टक्क्यांनी घट केली आहे. (IDBI Bank cuts savings deposit rates by 20 bps). याआधी एसबीआय बँकेनंसुद्धा व्याज दर कमी केले आहेत. त्यामुळे खातेधारकांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर एसबीआय ग्राहकांच्या खात्यामध्ये एक लाख रुपये जमा असतील तर ग्राहकाला एका वर्षात 2.75 टक्के व्याज दराने 2,750 रुपये व्याज मिळेल. भारतीय जीवन विमा महामंडळाकडून (LIC) मोठी हिस्सेदारी खरेदी केल्यानंतर आता आयडीबीआय बँक एक खासगी बँक झाली आहे. जानेवारी 2019 मध्ये एलआयसीने आयडीबीआय बँकेत 51 टक्के वाटा घेतला आहे. IDBI बँकेत झाला आणखी एक मोठा बदल IDBI बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या बोर्डाने अंशुमन शर्मा यांना शासकीय नामनिर्देशित संचालकपदी नियुक्त करण्यासाठी परवाणगी दिली आहे. त्यामुळे संचालक मंडळाचा पुढील आदेश येईपर्यंत 11 जून 2020 पासून आयडीबीआय बँक लिमिटेडच्या मंडळावर अंशुमन शर्मा हे काम पाहतील. पावसाळ्यात कोरोनाचा धोका आणखी वाढणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं PNB बँकेनंही बचत खात्यावरील व्याज दरही केलं कमी PNB बँकेनंही खातेधारकांच्या बचत खात्यावरील व्याजदर कमी केलं आहे. पीएनबीच्या बचत खात्यात 50 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर वर्षाकाठी 3 टक्के आणि 50 लाखांपेक्षा जास्त रकमेवर वर्षाकाठी 3.25 टक्के दरानं व्याज मिळेल. ICICI बँकेने बचत खात्याच्या व्याजदरामध्ये 0.25 टक्के घट केली आहे. ICICI बँकेने शेअर बाजारात दिलेल्या माहितीनुसार, 50 लाख रुपयांपेक्षा कमी बचत खात्यांवरील व्याजदर 0.25 टक्के कमी केला आहे. ज्यानंतर हा दर 3.25 टक्क्आंवरून 3 टक्के झाला आहे. इथे मिळतोय बचत खात्यावर 7 टक्के व्याज आईडीएफसी फर्स्ट बँकेच बचत खात्यामध्ये 1 लाख रुपये असतील तर वर्षाला 6 टक्के आणि 1 लाख ते 1 कोटी रुपये जमा असतील तर वर्षाला 7 टक्के व्याज दिलं जाईल. इतकंच नाही तर आईडीएफसी बँकेने घर बसल्या बँक खातं उघडण्याचीदेखील सेवा सुरू केली आहे. Bandhan Bank मध्ये बचत खात्यात असलेल्या 1 लाख ते 10 कोटी रुपयांपर्यंत 6 टक्के व्याज तर 10 कोटी ते 50 कोटी रुपये जमा असल्यास 6.55 टक्के व्याज आणि 50 कोटी जमा असल्यास 7 टक्के व्याजदर ठेवला आहे. 'धनंजय मुंडेंची दोनदा कोरोना चाचणी झाली पण...', राजेश टोपेंचा मोठा खुलासा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Lockdown, SBI

    पुढील बातम्या