Home /News /news /

पावसाळ्यात कोरोनाचा धोका आणखी वाढणार? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं

पावसाळ्यात कोरोनाचा धोका आणखी वाढणार? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि व्हायरल तापासारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. पण अशात कोरोनाचा आपल्यावर काय परिणाम होणार आणि तुम्ही स्वत:ची कशी काळजी घ्याल?

    नवी दिल्ली, 11 जून : देशात कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या 3 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. अशात तोंडावर आलेल्या मान्सूनमुळे (Monsoon) कोरोनाचा हाहाकार आणखी वाढणार असल्याच्या चर्चा आहे. अशात देशात अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असल्याची माहिती हवामान (Weather) विभागाकडून देण्यात आली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून तो उत्तरेकडे पुढे सरकला आहे. खरंतर पावसाळा आला म्हणजे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि व्हायरल तापासारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीमुळे देशात हाहाकार माजला आहे. ही चिंतेची बाब आहे. खरंतर व्हायरल ताप येणं आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये फारसा फरक नाहीये. म्हणूनच, कोरोना संसर्ग अधिक वेगानं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा येणार म्हटल्यामुळे यंदा लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे, अशात तुम्हालाही अनेक प्रश्न पडले असती. जाणून घेऊयात त्यासंबंधी उत्तरं... 'धनंजय मुंडेंची दोनदा कोरोना चाचणी झाली पण...', राजेश टोपेंचा मोठा खुलासा प्रश्न - हवामानामुळे कोरोना विषाणूवर परिणाम होऊ शकतो का? उत्तर - हवामानाचा परिणाम कोरोनावर होतो असं आतापर्यंतच्या कोणत्याही संशोधनात समोर आलेलं नाही. पावसाळा आला की कोरोनाचा धोका वाढणार आणि उन्हाळ्यात कोरोनाचा प्रवाभ कमी होणार अशा अनेक बातम्या समोर आल्या. पण तंस काही होताना दिसत नाही. प्रश्न - पावसाळा आला की कोरोना संपेल? उत्तर - पावसाचा कोरोना विषाणूवर काही परिणाम होत नाही. महत्त्वाचं म्हणजे कोरोना विषाणू हा हवेत नाही ही बाब लक्षात घ्यायला हवी. जर तुम्हाला कोरोना टाळायचा असेल तर त्यावर एकच उपचार आहे आणि तो म्हणजे वारंवार हात धुण्याची सवय लावणं आणि स्वच्छतेकडे लक्ष देणं. आपलं आरोग्य नीट असणं हीच कोरोनाला संपवण्याची पहिली लस आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर घाबरण्यापेक्षा आरोग्याची नीट काळजी घ्या. प्रश्न - कोरोना विषाणू बराच काळ घरात राहू शकतो? उत्तर - कोरोना विषाणू कोणत्याही वस्तूवर किंवा एखाद्या सामानावर बऱ्याच दिवसांपर्यंत असू शकतो. अशा वेळी, घर स्वच्छ करत राहणं. वस्तू साफ करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. घराच्या खिडक्या आणि दारं उघडी ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून घराच्या आत ताजी हवा येऊ शकेल. प्रश्न - पावसाळ्यात कोणत्या गोष्टींकडं विशेष लक्ष देणं आवश्यक आहे? उत्तर - पावसाळ्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत घरातदेखील चप्पल घालण्याचा प्रयत्न करा. पण घरातली आणि बाहेर घालण्याची चप्पल वेगळी ठेवा. वेळोवेळी घर, घरातल्या वस्तू, दारं-खिडक्या स्वच्छ ठेवा, घराचा मजला साफ ठेवा आणि दारे आणि खिडक्या खुल्या ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न - पावसात कोरोना संक्रमण होण्याची शक्यता जास्त आहे? उत्तर - पावसाळ्या असंख्य साथीचे रोग पसरतात. त्यामुळे हा एक आजारपणाचा मौसम आहे. या हंगामात, बॅक्टेरियाची संख्या वेगानं वाढत असते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, व्हायरल तापासारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यात शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. पण जर पावसाळ्यात आपली रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर मात्र कोरोना विषाणू होण्याचा धोका वाढतो. प्रश्न - पावसात रेनकोट आणि मास्क ओला झाला तर काय करावं? उत्तर - संशोधनानुसार, कोरोना व्हायरस बर्‍याच दिवस कपड्यांवर राहू शकतो. त्यामुळे जसे आपण रोज कपडे धुतो तसं रेनकोटही धुणं महत्त्लाचं आहे. त्यानंतर त्याला हवेत सुकवून पुन्हा घालता येईल. पण जर तुमचा मास्क ओला झाला असेल तर तो काढून टाकणंच योग्य आहे. फक्त पावसाच्या पाण्यामुळे नाही तर बर्‍याच वेळा मास्क ओला होतो. पण अशावेळी त्वरित मास्क काढून टाकला पाहिजे आणि दुसरा मास्क वापरला पाहिजे. प्रश्न - आर्द्रता (humidity) वाढली की कोरोनाचे काय होईल? उत्तर - पावसाळ्यात वाढणाऱ्या आर्द्रतेवर तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. आयआयटी बॉम्बेच्या म्हणण्यानुसार, वाढत्या आर्द्रतेमुळे कोरोना विषाणू आणखी धोकादायक होईल. तर काही तज्ज्ञांच म्हणणं आहे की, आर्द्रतेमुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका कमी होईल. खोकल्यामुळे आणि शिंकल्यामुळे थेंब बाहेर पडतात. आर्द्रतेमुळे हे थेंब मोठे होतात आणि खाली पडतात. याचा तसा शरीरावर परिणाम कमी होतो. प्रश्न - पावसाळ्यात एसी बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास केला तर चालेल का? उत्तर - पावसाळ्यात एसीमध्ये न राहणं हेच चांगलं आहे. जर कोणताही संक्रमित रुग्ण बस किंवा ट्रेनमध्ये असेल तर यामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढतो. खरंतर एसी-नसलेल्या बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास केला तरीही कोरोनाचा धोका आहेच. पण एसीमध्ये त्याचं प्रमाण आणि शक्यता जास्त आहे. प्रश्न - पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? उत्तर - पावसाळ्यात कोरोनासारख्याच काय इतरदेखील विषाणूला रोखण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी जीवनसत्त्वं ए, बी, सी, डी, लोहयुक्त पदार्थ जास्त असलेली फळं खावीत. त्याचबरोबर जेवणात लोणचं, लिंबू, गाजर, संत्री, डाळिंब, अक्रोड, बदाम, शेंगदाणे, लसूण आणि पालक अशा पदार्थांचा समावेश असावा. रातोरात स्टार झालेल्या राणू मंडलवर आली अशी वेळ, 2 वेळेचं अन्न मिळणंही अवघड संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india

    पुढील बातम्या