नवी दिल्ली, 12 जून : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. धनंजय मुंडे यांची दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील एक निगेटिव्ह आला आणि पॉझिटिव्ह आला. त्यांना कोणतीही लक्षणं दिसली नाहीत पण श्वसानाचा त्रास झाल्याच्या खुलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुंद्द्यांवर चर्चा केली आहे. धनंजय मुंडे व्यवस्थित आहेत धनंजय मुंडे यांनी कोरोनाची लागण झाली असली तरी ते व्यवस्थित आहे. पण त्यांना जरा श्वसनाचा त्रास झाला म्हणून ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले. ते आमच्यासोबत बैठकीसाठी उपस्थित होते. मंत्रीमंडळ बैठकीत सगळे फीजीकल डिस्टंसिंग राखून बसतात. आमच्या पक्षाच्या झेंडावंदनाच्या दिवशीदेखील फीजीकल डिस्टंसिंग पाळलं होतं. अजित पवारांच्या शिस्तीनुसार आम्ही बैठक करतो. मंत्रिमंडळ बैठकीतही ते अंतर राखलं जातं. सगळीकडे कोरोनामुळे बदल होतोय. त्यामुळे आम्हीही शिस्तीचं पालन करत असल्याची माहिती त्यांनी दिली. धनंजय मुंडे 8-10 दिवसात पुन्हा एकदा काम करायला लागतील. यापुढे सगळ्यांनाच जोपर्यंत कोरोनावर औषध येत नाही किंवा लस येत नाही तोपर्यंत त्याची काळजी करावी लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नियमांचं पालन करा आणि कोणतीही लक्षण दिसल्यास तात्काळ तपासणी करणं महत्त्वाचं असल्याचं टोपे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, ‘आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण टेस्टींग करतो. ज्याला लक्षणं आहेत त्यांनी टेस्टींग केली पाहिजे, हा कोणालाही होऊ शकतो. दरम्यान, मृतदेहांच्या बाबतीत कोणतंही गैरव्यवस्थापन नाही. एकाच प्रकरणात असं घडलं आहे. बेड नंबर्समध्ये बदल झाल्यामुळे हा प्रकार घडला होता. याला जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई होईल’ असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. काय घडलं शताब्दी रुग्णालयात? शताब्दी रुग्णालयात सीसीटीव्हीत दिसल्याप्रमाणे, एक व्यक्ती स्वच्छतागृहात जायचं सांगून बाहेर गेली. पण ती तिथे न जाता थेट रुग्णालयाच्या बाहेर गेली. यावेळी सुरक्षा रक्षकाने लक्ष दिलं नाही. त्यामुळे तिथल्या सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. आणि संबंधित इतरांवरही कारवाई करण्यात येईल. त्यावेळी रुग्णालयात असलेल्या स्टाफचा तपास सुरू असून संबंधतांवर कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचं टोपेंनी सांगितलं. संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.