खुनाच्या आरोपाखाली सगळं तारुण्य गेलं तुरुंगात, 21 वर्षांनी कोर्टानं ठरवलं निर्दोष

एका खून प्रकरणात 21 वर्ष आणि नऊ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर ओडिशा उच्च न्यायालयानं साधू प्रधान यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 04:50 PM IST

खुनाच्या आरोपाखाली सगळं तारुण्य गेलं तुरुंगात, 21 वर्षांनी कोर्टानं ठरवलं निर्दोष

ओडिशा, 24 ऑगस्ट : तारुण्य हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. तरुणपण आलं की आयुष्याला वेगळंच वळण लागतं. काहीतरी करण्याची जाणीव या वयात होते. पण सगळं तारुण्य जेलच्या भिंतीच्या आत गेलं आणि अचानक उतारवय लागताच तुमच्या विरोधात पुरावे मिळाले नाही म्हणून तुम्हाला सोडून देण्यात आलं तर...! धक्का बसला ना. असाच एक धक्कादायक प्रकार सत्यात घडला आहे. साधू प्रधान असं या व्यक्तीचं नाव आहे.

एका खून प्रकरणात 21 वर्ष आणि नऊ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर ओडिशा उच्च न्यायालयानं साधू प्रधान यांची निर्दोष मुक्तता केली आहे. साधू प्रधान यांना तत्काळ तुरुंगातून सोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. गंजम जिल्ह्यातील कांतापाडा गावात राहणारे साधू प्रधान यांना नोव्हेंबर 1997 मध्ये एका महिलेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. ऑगस्ट 1999 मध्ये त्यांना जिल्हा कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तेव्हापासून प्रधान जेलच्या भिंतीआड आहे. त्यांचं सगळं आयुष्य त्या अंधारात गेलं. आणि आता अर्ध आयुष्य उलटल्यानंतर कोर्टाने प्रधान यांची निर्दोष मुक्तता केली. कोर्टाच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

इतर बातम्या - नोकरी देतो सांगून महाराष्ट्रासह 16 राज्यातील 600 मुलींचे Nude फोटो गोळा केले आणि...!

जुलैमध्ये सुनावणी झाली पूर्ण...

खालच्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात त्यांची साधू प्रधान यांची एक याचिका हायकोर्टात न्यायाधीश एस.के. मिश्रा आणि ए के मिश्रा यांच्या न्यायालयात प्रलंबित होती. या प्रकरणात जुलैमध्ये सुनावणी पूर्ण करण्यात आली. 21 वर्ष आणि 9 महिने या प्रकरणात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. तरी प्रधान यांची सुटका करण्यात आली नाही. आणि इतक्या वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Loading...

इतर बातम्या - जेव्हा दाम्पत्याने PORN साईटवर पाहिला त्यांचाच अश्लील VIDEO आणि नंतर...!

खुनाचे कोणतेही कारण नव्हते...!

उच्च न्यायालयानं सोमवारी दिलेल्या निकालामध्ये प्रधान  यांची न्यायाधीशांनी निर्दोष मुक्त केली आहे. या प्रकरणात कोर्टाने म्हटलं आहे की, खूनमागील हेतू काय आहे हे सांगण्यात फिर्यादी वकील अपयशी ठरले. त्यामुळे साधू प्रधान यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

'असा नेता होणे नाही'; गिरीश महाजन, पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 04:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...