नोकरी देतो सांगून महाराष्ट्रासह 16 राज्यातील 600 मुलींचे Nude फोटो गोळा केले आणि...!

आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीसह 16 राज्यातील मुली आरोपी इंजिनिअरच्या निशाण्यावर होत्या. या मुलींकडून त्याने लाखो रुपये वसूल केले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 04:04 PM IST

नोकरी देतो सांगून महाराष्ट्रासह 16 राज्यातील 600 मुलींचे Nude फोटो गोळा केले आणि...!

चेन्नई, 24 ऑगस्ट : सध्याच्या जगात नोकऱ्यांसाठी प्रचंड ओढाओढ आहे. त्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळावी यासाठी हल्ली कोणीही काहीही करण्यासाठी तयार होतं. असाच एक धक्कादायक प्रकार चैन्नईमध्ये घडला आहे. 'चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर तुझे न्यूड फोटो पाठव' असं म्हणत एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने तब्बल 600 मुलींकडून अश्लील फोटो घेऊन त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने देशाच्या विविध राज्यांतील 600 मुलींना नोकरीसाठी न्यूड फोटो आणि व्हिडिओ मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलींनीही नोकरीसाठी त्याला फोटो आणि व्हिडिओ पाठवले. आरोपी इंजिनिअर चेन्नईचा रहिवासी आहे.

हॉटेलचा एचआर मॅनेजर असल्याचं चांगत त्यांना नोकरीचं आमिष दाखवायचा. तरुणींचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ मिळाल्यानंतर आरोपी इंजिनिअर या मुलींना ब्लॅकमेल करण्यास सुरू करायचा. त्या बदल्यात मुलींकडून त्याने अनेक वेळा पैशांची मागणी केली होती. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी इंजिनिअरला अटक केली आहे.

इतर बातम्या - जेव्हा दाम्पत्याने PORN साईटवर पाहिला त्यांचाच अश्लील VIDEO आणि नंतर...!

राज चेझियान उर्फ ​​प्रदीप असं आरोपी इंजिनिअरचं नाव आहे. प्रदीपला सायबराबाद पोलिसांनी चेन्नईतून त्याच्या राहत्या घरातून अटक केली. हैदराबाद इथल्या एका महिलेने प्रदीपविरोधात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीसह 16 राज्यातील मुली प्रदीपच्या निशाण्यावर होत्या. या मुलींकडून प्रदीपने लाखो रुपये वसूल केले आहेत.

Loading...

इतर बातम्या - महाराष्ट्रात पुन्हा कोल्हा'पूर' होऊ नये म्हणून सरकारने उचललं पाऊल

दरम्यान, प्रदीप एका मोठ्या आयटी कंपनीत काम करतो आणि तो त्याच्या घरातून बनावट एचआर कंपनी चालवत होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. चौकशीवेळी प्रदीपने तशी कबूलीही दिली आहे. मी तब्बल 600 मुलींना अशा पद्धतीने फसवलं असल्याचं प्रदीपने म्हटलं आहे.

VIDEO: 'मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...