नवी दिल्ली, 11 मे : चीनमधून जगभरात पसरण्यास सुरुवात झालेल्या कोरोनाव्हायरसमुळं परिस्थिती बिकट होत चालली आहे. खतरनाक व्हायरससमोर भल्या भल्या देशांनी गुडघे टेकले. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर, जगभरातील कोरोना संक्रमितांची संख्या 40 लाखांहून अधिक झाली आहे. भारतात ही संख्या 67 हजारांवर जाऊन पोहचली आहे, तर 2206 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. या सगळ्यात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
कोव्हिड-19चे WHO विशेष प्रतिनिधी डॉ. डेव्हिड नाबरो यांनी कोरोनाला हरवण्यासाठी भारतानं केलेल्या तयारीचे कौतुक केले आहे. डॉ. डेव्हिड यांनी असे सांगितले की, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी भारताकडून योग्य पाऊले उचलली जात आहेत. अशा कठिण समयी त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे आम्ही कौतुक करतो.
वाचा-अरे बापरे! शहरात तब्बल 334 कोरोना सुपर स्प्रेडर; नकळत पसरवत आहेत व्हायरस
डॉ. डेव्हिड म्हणाले की, कालांतराने देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले ज्याचा परिणाम असा झाला की भारतासारख्या देशात कोरोनाची वेग वाढला नाही. भारतात, देशव्यापी लॉकडाउन व्यतिरिक्त, आयसोलेशन आणि कोरोना संक्रमित व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न केले आहेत. यामुळं भारतात कोरोना संक्रमित रूग्णांची नियंत्रणात आहे. तसेच, डेव्हिड यांनी मोदी सरकारचे कौतुक करत, त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळं बर्याच अडचणींचा सामना करावा लागला, परंतु कोरोना विषाणूविरूद्ध दृढपणे लढा देण्याची संधी भारतीय लोकांना मिळाली, असे सांगितले.
वाचा-औरंगाबादमध्ये धोका वाढला! कोरोनाने घेतला 14 वा बळी तर रुग्णसंख्या 600 वर
भारतात 24 मार्च रोजी केली लॉकडाऊनची घोषणा
डेव्हिड म्हणाले की, लॉकडाऊन लवकरच भारतात लागू करण्यात आला. 24 मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. जेव्हा कोरोना येथे फारच कमी प्रकरणे आढळली तेव्हा हा निर्णय अंमलात आला. निश्चितच, भारत सरकारने केलेल्या कृती आपल्या दूरदर्शी विचारांची होती. ते म्हणाले की आमचा विश्वास आहे की या निर्णयामुळे बर्याच लोकांना समस्याही आल्या आहेत, परंतु जर ही वेळेत अंमलबजावणी झाली नसती तर परिणाम भयंक झाले असते.
कोरोनाव्हायरससोबत राहणं शिकले पाहिजे
डेव्हिड असेही म्हणाले की, मला अपेक्षा नाही की दोन वर्षात कोरोनावर लस मिळेल. त्यामुळं लोकांना कोरोनासोबत राहणं शिकले पाहिजे. दोन वर्षे तरी आपण या विषाणूसह जगण्याची सवय लावली पाहिजे. जगभरात उपस्थित 7.8 अब्ज लोकांना देखील त्याबद्दल विचार करावा लागेल आणि काळाप्रमाणे स्वत:मध्ये तसे बदल करावे लागतील.
वाचा-ना औषध ना लस, 23 दिवसांच्या बाळानं फक्त आईच्या दूधानं कोरोनाला हरवलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.