Home /News /national /

ना औषध ना लस, 23 दिवसांच्या बाळानं फक्त आईच्या दूधानं कोरोनाला हरवलं

ना औषध ना लस, 23 दिवसांच्या बाळानं फक्त आईच्या दूधानं कोरोनाला हरवलं

आईच्या दुधानं 23 दिवसांच्या बाळाला दिली कोरोनाला हरवण्याची ताकद. कोरोना रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले.

    भोपाळ, 11 मे : कोरोनामुळं साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्या वेगानं वाढत आहे. यात 60 वर्षांखालील वृद्ध आणि नवजात बालकांना जास्त धोका निर्माण झाला आहे. एकीकडे कोरोनाची उद्रेक होत असताना, अद्याप कोणत्याही देशाला कोरोनावर औषध किंवा लस शोधता आलेले नाही आहे. अशा सगळ्यात एका 23 दिवसांच्या बाळानं कोरोनावर मात केली. मुख्य म्हणजे या बाळाला कोणतेही औषध देण्यात आलं नव्हतं. मध्यप्रदेशातील भोपाळ येथे या 23 दिवसांच्या बाळानं आईच्या दूधाच्या साहाय्यानं कोरोनावर मात केली. 23 दिवसांच्या या बाळाला 20 मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळं या बाळाला भोपाळच्या एसएन मेडिकल कॉलेजच्या आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. सर्वात लहान वयाचा कोरोना रुग्णाला पाहून डॉक्टरही हादरले होते. त्यामुळं या बाळासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्याची आई कोरोना निगेटिव्ह असल्यामुळं ती बाळासोबत पीपीई किट परिधान करून राहत होती. वाचा-Corona रुग्णांचा मृत्यू कसा झाला? आता डॉक्टरांना कारण द्यावं लागणार 14 दिवसांनी डॉक्टरांनी बाळाची कोरोना चाचणी केल्यानंतरही त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून येत नव्हती. त्यामुळं त्याच्यावर कसे उपचार करायचे, असा प्रश्न डॉक्टरांपुढे होता. त्यात मुलाचे वय ही लहान असल्यामुळं औषधांचा विपरीत परिणाही त्याच्यावर होण्याचा धोका होता. वाचा-कॅन्सरग्रस्त लेकीला कोरोनापासून वाचवण्यासाठी 50 दिवस दूर होता बाप, अखेर झाली भेट बाळ 23 दिवसांचे असल्यामुळं त्याला आईचे दूध देण्यात आले. दिवसातून 5-7 वेळा आई त्याला दूध पाजत असे. दरम्यान डॉक्टरांनी बाळाच्या प्रकृतीत प्रगती दिसून आली, म्हणून त्यांनी बाळाची कोरोना चाचणी केली. त्यावळी या बाळाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला. बाळाचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले. 14 दिवसांनी बाळानं कोरोनार मात केल्यानंतर त्याचे टाळ्या वाजवत नॉर्मल वॉर्डमध्ये स्वागत करण्यात आले. वाचा-पुण्यात कोरोनाच्या 30 ते 40 टक्के रुग्णांना मिळणार डिस्चार्ज, 5 मोठ्या अपडेट्स
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या