नवी दिल्ली 06 जानेवारी : एक छोट्याशा चुकीमुळे प्रियांकाने आपलं सुंदर आयुष्य क्षणभरात गमावलं. कडाक्याच्या थंडीत प्रियांका नेहमीप्रमाणे अंघोळीसाठी बाथरूममध्ये पाणी गरम करत होती. पाणी गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक रॉड (Electric Rod in Bathroom) लावण्यात आला होता. प्रियांकाने अंघोळीसाठी बाथरूम आतून बंद केलं, मात्र यानंतर ती बाथरूममधून मृतावस्थेतच बाहेर आली. पाणी गरम करत असताना करंट लागून प्रियांकाचा मृत्यू झाला (Woman Dies After Electrocution).
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या अलिगढमधील जट्टारी कसबा क्षेत्रातील गौरोला येथील आहे. प्रियांका गौरोला येथील गाव प्रमुख यादवेंद्र सिंह उर्फ यादू यांची पत्नी होती, जिचा बाथरूममध्ये विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. बाथरूमचा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला. सुमारे 5-6 तासांनंतर प्रियांकाच्या शरीराची हालचाल जाणवू लागल्याने कुटुंबीय तिला घेऊन दिल्लीला गेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक रॉडने पाणी गरम होत असतानाच प्रियांका बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेली आणि करंट लागून तिचा मृत्यू झाला. काही वेळानंतर प्रियांकाची 5 वर्षीय मुलगी लविका हिने आपल्या आईला कपडे घालून देण्यासाठी हाक मारली मात्र आतून काहीच आवाज आला नाही. लविकाने याबाबतची माहिती आपल्या आजीला दिली.
आजीने तिथे जाऊन बाथरूमचा दरवाजा वाजवला मात्र आतून काहीच आवाज आला नाही. यामुळे महिला जोरजोराने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्य तिथे आले. प्रियांकाला दरवाजा तोडून बाथरूममधून बाहेर काढण्यात आलं. गंभीर अवस्थेत कुटुंबीय तिला कैलास रुग्णालयात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
प्रियांकाच्या मृत्यूनंतर घरात एकच खळबळ उडाली. लोक त्यांच्या घराबाहेर सांत्वनासाठी येत होते. मात्र इतक्यात प्रियांका हालचाल करत असल्याचं जाणवू लागलं. यानंतर लगेचच कुटुंबीय तिला दिल्लीला घेऊन गेले, मात्र तिथेही डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. एका लहानशा हलगर्जीपणामुळे हसत्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. इलेक्ट्रिक वस्तू रॉड, गिजर, हीटर, ब्लोअर यांचा वापर करताना अतिशय सावधान राहाणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Winter, Woman dead body